प्रत्येक मुलगी आणि मुलाला पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यास शरीरात काय बदल होतात हे माहीत असायला हवे
लैंगिक संबंध हा विषय आता निषिद्ध राहिलेला नाही किंवा वैवाहिक जीवनाचा केवळ विषय राहिलेला नाही. पण हा निश्चितच तुमच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा आहे. आपल्याकडे आताही लोक त्याबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. यामुळेच त्याबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत. बहुतेक किशोरवयीन मुले आणि तरुणी इंटरनेटवर पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काय होते याबद्दल शोध घेतात?
आम्ही तुम्हाला त्या सर्व तथ्यांबद्दल सांगत आहोत जे तुम्हाला पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जाणवू शकतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जी साधारण 18 व्या वयानंतर मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाला माहीत असायला हवी (फोटो सौजन्य – iStock)
दुखणे आहे सामान्य
पहिल्यांदा जर तुम्ही शारीरिक संबंध करत असाल तर वेदना होणे सामान्य आहे. यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात, परंतु ती सर्व कारणे पूर्णपणे सामान्य आहेत. तुमचे Hymen ताणल्यामुळे, ल्युब्रिकेशन व्यवस्थित नसल्यामुळे किंवा व्हजाइनिस्मसमुळे वेदना होऊ शकतात, ज्यामुळे पेल्विक स्नायू घट्ट होतात. चिंता हेदेखील तुमच्या वेदनांचे कारण असू शकते. लैंगिक संबंधांशी संबंधित धार्मिक श्रद्धा किंवा काही जुने आघातदेखील असू शकतात.
कधीकधी सुरुवातीला जेव्हा एखाद्याला संभोग करताना कामोत्तेजना होते, तेव्हा गर्भाशयात पेटके येऊ लागतात. संभोग करताना ऑक्सिटोसिन सोडले जाते, ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन झाल्यामुळे वेदना होऊ शकतात.
Pregnancy दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून योग्य माहिती
स्पॉटिंग होण्याची शक्यता
तुम्हाला संभोग केल्यानंतर रक्तस्त्राव होऊ शकतो, तसेच शारारिक संबंधानंतर रक्तस्त्राव न होण्याचीही शक्यता आहे. दोन्ही परिस्थिती सामान्य आहेत. जर तुम्हाला पहिल्यांदा संभोग केल्यानंतर रक्तस्त्राव होत असेल तर ते हायमेनमुळे आहे. हायमेन हा त्वचेचा एक पातळ पडदा आहे जो संभोगादरम्यान ताणला जातो आणि रक्तस्त्राव होऊ शकतो. हायमेन सहजपणे ताणले जाऊ शकते आणि ते तुटण्याचे एकमेव कारण लैंगिक संबंध नाही. खेळांमुळेही हायमेन तुटू शकते. टॅम्पन्सचा वापर देखील हायमेन खराब करू शकतो. हायमेनचा तुमच्या कौमार्यशी काहीही संबंध नाही असे डॉक्टरांनी सांगितले.
लघवीदरम्यान जळजळ
जर तुम्हाला संभोग केल्यानंतर बाथरूममध्ये गेल्यावर जर लघवी करताना जळजळ होत असेल तर ते सामान्य आहे. योनी आणि मूत्रमार्ग एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्यामुळे योनीवर कोणताही दाब पडल्यास मूत्रमार्गात वेदना होतात. पण जर ही वेदना दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
व्हजायनामध्ये खाज येणे
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुम्हाला व्हजायनामध्ये सौम्य खाज सुटणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला तीव्र खाज येत असेल जी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, तर ते कंडोमच्या allergy मुळेही असू शकते. जर तुम्ही ल्युब्रिकंट वापरले असेल तर ते देखील अॅलर्जीचे कारण असू शकते.
UTI चा त्रास
संभोगादरम्यान, तुमच्या गुदद्वाराजवळील बॅक्टेरिया तुमच्या योनी आणि मूत्रमार्गात जाऊ शकतात. यामुळे वेदनादायक युटीआयचा त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होते मात्र याकडे दुर्लक्ष करू नका कारण यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ही सामान्य स्थिती असली तरीही दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही
निप्पल्सच्या आकारात बदल
संभोगादरम्यान तुमच्या स्तनाग्रांमध्ये अनेक नसा एकत्र येऊन थांबतात, ज्यामुळे तुम्ही उत्तेजित झाल्यावर तुमच्या स्तनाग्रांचा आकार बदलतो. यामुळे तुमच्या स्तनाच्या ऊतींना सूज येते आणि तुमचे स्तन मोठे दिसू शकतात. एवढेच नाही तर जेव्हा तुम्हाला लैंगिक उत्तेजन मिळते तेव्हा तुमचे स्तनाग्र घट्ट होतात. त्याचप्रमाणे, क्लिटॉरिसमध्ये अनेक नसा येऊन थांबतात ज्यामुळे क्लिटॉरिसचा आकार वाढतो. तथापि, संभोग करून झाल्यानंतर ही स्थिती अत्यंत सामान्य होते आणि स्तनांचा आकार पूर्ववत होतो
शारीरिक संबंध न ठेवता किती काळ जिवंत राहू शकता? काय सांगता तज्ज्ञ?
हॅप्पी हार्मान्स
जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध करायला सुरुवात करता तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. एवढेच नाही तर उत्तेजित झाल्यावर स्तनाग्र, एरोला आणि क्लिटॉरिसचे स्नायू ताणले जातात. यादरम्यान तुम्हाला कामोत्तेजना होऊ शकते. या सगळ्यामागील कारण म्हणजे मेंदूतील ऑक्सिटोसिनची वाढलेली पातळी जी शारीरिक संबंधामुळे वाढते.
व्हजायना इलास्टिसिटी बदलते
तुमच्या योनीचे स्नायू खूप लवचिक असतात आणि ही लवचिकता बदलत राहते. शारीरिक संबंधानंतर महिलांची योनी बरीच उघडते, जे संपूर्णतः सामान्य आहे त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. महिलांनो, शारिरिक संबंधांपूर्वी, नंतर किंवा दरम्यान तुमच्या शरीरात कोणते बदल होतील हे जाणून घ्या जेणेकरून तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करू शकाल.