
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या की दर्जा नक्की काय महत्त्वाचे (फोटो सौजन्य - iStock)
जीवनशैलीतील बदल, औषधे आणि हार्मोनल उपचारांद्वारे यावर उपाय केला जाऊ शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का, शुक्राणूंची संख्या की गुणवत्ता, यापैकी अधिक महत्त्वाचे काय आहे?
स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिव्या गोस्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पुरुषांच्या प्रजननक्षमतेचा प्रश्न येतो, तेव्हा बहुतेक लोक केवळ Sperms च्या संख्येवर लक्ष केंद्रित करतात. पण सत्य हे आहे की, केवळ Sperm ची संख्याच सर्व काही नसते. शुक्राणूंची संख्या जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांची गुणवत्ताही महत्त्वाची आहे.
Sperms ची संख्या आपल्याला सांगते की वीर्यामध्ये किती शुक्राणू आहेत. शुक्राणूंची गुणवत्ता ठरवते की ते त्यांचे कार्य योग्यरित्या पार पाडू शकतील की नाही. यामध्ये शुक्राणूंची हालचाल ज्याला मोटिलिटी म्हणतात, त्यांचा आकार सामान्य आहे की नाही ज्याला मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं आणि त्यांच्यातील जनुकीय सामग्री निरोगी आहे की नाही, या गोष्टी तपासल्या जातात.
जर Men Sperm ची संख्या चांगली असेल, परंतु त्यापैकी बहुतेक योग्यरित्या हालचाल करू शकत नसतील किंवा त्यांचा आकार चुकीचा असेल, तर त्यांना अंड्यापर्यंत पोहोचून त्याचे फलन करणे कठीण होते. पण, जर शुक्राणूंची संख्या थोडी कमी असेल, परंतु उपस्थित असलेले शुक्राणू चांगल्या गुणवत्तेचे आणि सक्रिय असतील, तरीही गर्भधारणा होऊ शकते. म्हणूनच, केवळ शुक्राणूंची संख्या पाहून कोणाच्याही प्रजननक्षमतेचा अंदाज लावता येत नाही.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयव्हीएफसारख्या उपचारांमध्ये शुक्राणूंची चांगली गुणवत्ता अधिक महत्त्वाची असते. स्पर्म्स जितके निरोगी असतील, तितकी फलनाची आणि निरोगी भ्रूण तयार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, शुक्राणूंची संख्या की शुक्राणूंची गुणवत्ता यापैकी काय अधिक महत्त्वाचे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर शुक्राणूंचे एकूण आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यामुळेच अखेरीस निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढते.
पुरुषांची ‘Sperm’ समस्या दूर होईल ‘या’ हिरव्या पानांमुळे, फायदे वाचून उडेल झोप