पुरुषांच्या स्पर्म काऊंट वाढीसाठी उत्तम भाजी (फोटो सौजन्य - iStock)
मोरिंगा ज्याला सामान्यतः ड्रमस्टिक अथवा शेवग्याच्या शेंगा म्हणून ओळखले जाते. शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही लोक याला ढोलकी म्हणूनही ओळखतात. शेवग्याच्या शेंगांची भाजी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्हाला माहिती आहे का की शेवग्याच्या शेंगा आणि त्यांची पाने हे पुरुषांसाठी औषधापेक्षा कमी नाही. दररोज शेवग्याच्या शेंगांचे वा पानाचे सेवन केल्याने पुरुषांच्या अनेक समस्या दूर होतात.
वंध्यत्व
वंध्यत्वाची समस्या होईल दूर
आजकाल, अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, बहुतेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढली आहे. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते. तुम्ही भाजी वा सूपमधून याचे सेवन करू शकता. तसंच शेवग्याच्या शेंगांच्या पानांचाही तुम्ही सूपमध्ये वापर करून घेऊ शकता. वंधत्वाची समस्या कमी करण्यसाठी हा सर्वात उत्तम उपाय मानला जातो.
पुरुषहो! 5 गोष्टींमुळे होतोय Sperm Count कमी, तुम्ही तर ‘ही’ चूक करत नाही ना?
स्पर्म काऊंट
स्पर्म काऊंट वाढविण्यासाठी उत्तम ठरतील शेवग्याच्या शेंगा
वडील होणे हा कोणत्याही पुरूषासाठी खूप खास क्षण असतो. पण शुक्राणूंची संख्या कमी असल्याने काही लोकांची स्वप्ने सहजासहजी पूर्ण होत नाहीत. कमी शुक्राणूंची संख्या असलेल्या पुरुषांनी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढते आणि शुक्राणूंची गुणवत्ता देखील सुधारते. अनेक अभ्यासामधूनही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुमचा स्पर्म काऊंट कमी असेल तर घाबरून जायची गरज नाही. शेवग्याच्या शेंगांचे सेवन तुम्ही बिनधास्त करू शकता
ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशरही होईल कमी
आजकाल लहान मुलांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या दिसून येत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. मोरिंगा सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ही समस्या दीर्घकाळ तुमच्यापासून दूर राहते. लहानपणापासूनच शेवग्याच्या शेंगांचे सूप पिण्याची सवय पालकांनी लावावी. यामुळे त्यांच्या शरीरालाही फायदे मिळतात
पुरुषांमधील Sperm Count होतोय कमी, जीवनशैलीतील बदलांचा शुक्राणूंच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम
टेस्टोस्टेरॉन
टेस्टोस्टेरॉनची समस्याही होईल दूर
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. मोरिंगा सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते, ज्यामुळे शारीरिक शक्ती वाढते. सध्या टेस्टोस्टेरॉनची समस्यादेखील वाढीला लागली आहे. तुम्ही डॉक्टरांनाच दाखवणे गरजेचे तर आहेच पण घरगुती उपाय म्हणून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करायला अजिबात विसरू नका.