पुरुषांचा स्टॅमिना वाढविण्यासाठी पदार्थ
अनेक विवाहित पुरुषांना अनेकदा शारीरिक कमकुवतपणाचा सामना करावा लागतो. याचे कारण व्यस्त जीवन आणि अस्वस्थ जीवनशैली असू शकते. सहनशक्तीच्या अभावामुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही काही खास पदार्थ खाऊन तुमचा स्टॅमिना वाढवू शकता, जेणेकरून तुमचे उर्वरित आयुष्य आनंदी राहील.
सध्या चुकीची राहण्याची पद्धत, खाण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही वंध्यत्वाची समस्या उद्भवू लागली आहे. पुरुषांच्या आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होताना दिसून येत आहे आणि याचाच परिणाम शारीरिक सुख देता वा घेता न येणे असाही होताना दिसतोय, याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र काही खास पदार्थ खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना नक्कीच वाढू शकतो असे प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतात तज्ज्ञ
भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, असे अनेक पदार्थ आहेत जे पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. या गोष्टींमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन आढळतो, जो लग्नानंतर येणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. यामुळे तुम्ही शारीरिक सुखाचा चांगला अनुभव आणि आनंदही घेऊ शकता आणि तुमचा योग्य स्टॅमिना टिकवू शकता
अश्वगंधा
अश्वगंधा नियमित खाण्यानेही वाढेल स्टॅमिना
अश्वगंधा हे शतकानुशतके जुने औषध आहे. त्याच्या सेवनाने विशेषतः शुक्रधातूचे प्रमाण वाढते. अश्वगंधा टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम करते. चांगल्या परिणामांसाठी, दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घ्या. अश्वगंधा हे आयुर्वेदिक औषध असल्याने याचे दुष्परिणाम होत नाहीत. मात्र आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य डोस घ्यावा आणि किती सेवन करावे याबाबत योग्य माहिती घ्यावी
6 पदार्थ जे वाढवतात शारीरिक संबंधासाठी Stamina, जास्त काळ लुटू शकता आनंद; आहारात समाविष्ट कराच
दुधात खजूर मिक्स करावा
खजुराचे सेवन करण्याने पुरुषा्ंचा स्टॅमिना वाढतो
दुधात रात्री सुके खजूर उकळून खाल्ल्याने लैंगिक इच्छा आणि लैंगिक शक्ती वाढू शकते. तुम्ही दररोज 100 ग्रॅम खजूर खाऊ शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रात्रभर दुधात खजूर भिजवून सकाळीदेखील त्याचे नियमित सेवन करू शकता. खजूर तुमचा स्टॅमिना वाढविण्यासाठी अत्यंत योग्य आणि उत्तम उपाय आहे
आवळा खाणे
आवळ्याचे सेवन करण्याने होईल फायदा
आवळा खाणे डोळे आणि केसांसाठी फायदेशीर आहे. आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत याबाबत अनेकदा आयुर्वेदिक टिप्स देत सांगण्यात येते. मात्र जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर आवळा नक्की खा. एक चमचा मध आणि आवळ्याच्या पावडरमध्ये मिसळा आणि दिवसातून दोनदा खा
थकवा, अशक्तपणामुळे कमी झालेला शरीरातील स्टॅमिना पुन्हा वाढवण्यासाठी दुधासोबत करा ‘या’ फळाचे सेवन
कांदा – लसूण
कांदा आणि लसूण खाण्यामुळे वाढतो स्टॅमिना
पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी कांदा आणि लसूणचे सेवन प्रभावी मानले जाते. दररोज लसणाच्या दोन किंवा तीन पाकळ्या खाणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, पांढऱ्या कांद्याचे सेवन करणे योग्य मानले जाते. पुरुषांचा स्टॅमिना वाढण्यासाठी कांदा आणि लसूण हे दोन्ही पदार्थ अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी मानले जातात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.