Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Brain Tumor Day: मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर कोणता? जाणून घ्या गंभीर आजारांची लक्षणे आणि त्यावरील योग्य उपचार

ब्रेन ट्युमर कोणत्याही व्यायोगटातील मुलामुलींना होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी या आजाराच्या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.मेंदूमध्ये तयार होणाऱ्या गाठी संपूर्ण शरीरावर परिणाम करतात. चला तर जाणून घेऊया मेंदूमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर कोणता?

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2026 | 03:01 PM
मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर कोणता? जाणून घ्या गंभीर आजारांची लक्षणे आणि त्यावरील योग्य उपचार

मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर कोणता? जाणून घ्या गंभीर आजारांची लक्षणे आणि त्यावरील योग्य उपचार

Follow Us
Follow Us:

८ जूनला संपूर्ण जगभरात जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो. या दिवसाचे प्रमुख उद्देश म्हणजे मेंदूच्या गंभीर आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृकता निर्माण करणे. सन २००० मध्ये ‘जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन’ ने जागतिक ब्रेन ट्युमर दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात आला. मेंदूमध्ये गाठी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे फार आवश्यक आहे. ब्रेन ट्यूमर जसा प्रौढांमध्ये आढळून येतो, तसाच ते मुलांमध्येही आढळून येतात. मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या ब्रेन ट्युमरबाबत बोलताना तज्ज्ञ सांगतात की, पालकांनी कोणत्याही असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. मेंदूच्या गंभीर आजाराबद्दल डॉ. शिजी चालीपट, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन ॲण्ड चिल्ड्रन, पुणे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

मुंबईतील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी! ३.५ वर्षांच्या चिमुकल्याच्या मेंदूतील दुर्मिळ ट्यूमर काढून परत मिळवून दिली हरवलेली वाणी

ब्रेन ट्युमर कोणत्याही वयोगटातील मुलांना होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या आजाराच्या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मेंदूतील गाठ ही तिच्या आकारावर आणि मेंदूमधील स्थानावर अवलंबून असते. सकाळच्या वेळी अधिक तीव्र होणारी सततची डोकेदुखी, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वारंवार उलट्या होणे, तोल जाणे, चालताना अडचण येणे, धूसर दिसणे, फिट्स (झटके) येणे, वर्तणुकीत बदल होणे, अभ्यासातील प्रगती कमी होणे किंवा नेहमीपेक्षा अधिक झोप येणे ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत. लहान बाळांमध्ये डोक्याचा आकार असामान्य रित्या वाढणे किंवा शारीरिक विकासाचा विकासाची विलंब होणे हीदेखील चिंतेची बाब असून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार आढळतात. त्यापैकी पायलोसाइटिक अॅस्ट्रोसाइटोमा (Pilocytic Astrocytoma) हा सर्वात सामान्य प्रकार मानला जातो. ही गाठ हळूहळू वाढणारी आणि बहुतेक वेळा कर्करोगजन्य नसते. ती प्रामुख्याने मेंदूच्या सेरेबेलम (Cerebellum) भागात विकसित होते, जो शरीराचा तोल आणि समन्वय राखण्याचे कार्य करतो. याशिवाय मेड्युलोब्लास्टोमा (Medulloblastoma) हा वेगाने वाढणारा ट्यूमर, एपेंडायमोमा (Ependymoma) जो मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील द्रवाने भरलेल्या पोकळ्यांमध्ये विकसित होतो, तसेच डिफ्यूज लो-ग्रेड ग्लायोमा (Diffuse Low-Grade Glioma) हा तुलनेने हळूहळू वाढणारा ट्यूमरही मुलांमध्ये आढळून येतो.

निदानासाठी मुलाची सविस्तर न्यूरोलॉजिकल तपासणी केली जाते. तसेच ट्युमरचे स्थान आणि आकार समजून घेण्यासाठी एमआरआय (MRI) स्कॅनचा उपयोग केला जातो. काही वेळा गाठीचा नेमका प्रकार निश्चित करण्यासाठी बायोप्सीचीही आवश्यकता भासू शकते.

उपचार कसे केले जातात?

ब्रेन ट्युमरचे निदान झाल्यानंतर तज्ज्ञ डॅाक्टर उपचारांची दिशा ठरवतात. गाठीचा प्रकार, तिचे स्थान आणि मुलाची एकूण प्रकृती यानुसार उपचार योजना आखली जाते. शस्त्रक्रियेच्या मदतीने गाठ सुरक्षितपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी हालचाल करणे, बोलणे, दृष्टी आणि शिकण्याची क्षमता यांसारख्या मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यांचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जातो.

आजच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मेंदूच्या गाठींवर अधिक सुरक्षित आणि अचूक उपचार करणे शक्य झाले आहे. न्यूरोनॅव्हिगेशन, इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंग आणि हाय-प्रिसिजन इमेजिंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया अधिक प्रभावीपणे केली जाते.

पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम

मुलांमध्ये वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे मुलांच्या जीवनमानात चांगला बदल होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही शंका असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर कोणता आहे?

    Ans: मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या ब्रेन ट्यूमरपैकी मेडुलोब्लास्टोमा (Medulloblastoma) हा एक महत्त्वाचा ट्यूमर आहे. हा प्रामुख्याने मेंदूच्या मागील भागात विकसित होतो.

  • Que: मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर होण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: बहुतेक प्रकरणांमध्ये नेमके कारण स्पष्ट नसते. काही वेळा आनुवंशिक घटक, जनुकीय बदल किंवा दुर्मीळ सिंड्रोम यांचा संबंध असू शकतो.

  • Que: ब्रेन ट्यूमरचे निदान कसे केले जाते?

    Ans: एमआरआय (MRI), सीटी स्कॅन (CT Scan), न्यूरोलॉजिकल तपासणी आणि आवश्यक असल्यास बायोप्सीद्वारे निदान केले जाते.

Web Title: What is the most common brain tumor in children know the symptoms of serious diseases and their proper treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • brain tumor
  • Doctor advice
  • World Brain Tumor Day

संबंधित बातम्या

मुंबईतील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी! ३.५ वर्षांच्या चिमुकल्याच्या मेंदूतील दुर्मिळ ट्यूमर काढून परत मिळवून दिली हरवलेली वाणी
1

मुंबईतील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी! ३.५ वर्षांच्या चिमुकल्याच्या मेंदूतील दुर्मिळ ट्यूमर काढून परत मिळवून दिली हरवलेली वाणी

Brain Tumor : मेंदूत गाठ कशी होते अन् त्याचे धोके काय? तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती
2

Brain Tumor : मेंदूत गाठ कशी होते अन् त्याचे धोके काय? तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती

Brain Tumor: निष्काळजीपणा की मेंदूतील ट्युमरचे संकेत? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर
3

Brain Tumor: निष्काळजीपणा की मेंदूतील ट्युमरचे संकेत? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.