पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम
वजन कमी करण्यासाठी उपाय?
आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्याची कृती?
आयुर्वेदिक ड्रिंक पिण्याचे फायदे?
जगभरात लठ्ठपणाच्या समस्येने असंख्य लोक त्रस्त आहेत. दैनंदिन आहारात होणारे बदल, झोपेच्या वेळा, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे झपाट्याने वजन वाढत जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. वजन वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण वाढलेल्या वजनामुळे शरीराला हानी पोहचण्यास सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळे उपाय केले जातात. शरीरात वाढलेला अनावश्यक चरबीचा थर संपूर्ण शरीराचा आकार बदलून टाकतो. पोट मांड्यावर वाढलेल्या चरबीमुळे महिलांना कपडे खरेदी करताना किंवा बाहेर जाताना कपड्यांची निवड करताना खूप जास्त गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण सुद्धा होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरावर अनावश्यक चरबीचा थर वाढल्यानंतर अनेक लोक महागडे डाएट, तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम, सप्लिमेंट्स, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टीचे सेवन करतात. मात्र त्याचा फारसा बदल परिणाम दिसून येत नाही. काहीवेळा केमिकल युक्त सप्लिमेंट्स घेतल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन नैसर्गिकरित्या कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीरावर वाढलेला चरबीचा अनावश्यक थर कमी करण्यास मदत करतो. हे पदार्थ पाण्यात मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीरात जमा झालेली घाण सुद्धा बाहेर पडून जाईल.
आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट आणि अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आल्याच्या सेवनामुळे शरीरावर जमा झालेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य निरोगी राहते. शरीराचा मेटाबॉलिज्म रेट वेगाने वाढवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. रात्रीच्या वेळी आल्याचे सेवन केल्यास सकाळी उठल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. लवंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी लवंगाचे सेवन केले जाते. विटामिन सी युक्त लिंबाचा रस शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास महिनाभरात झपाट्याने वजन कमी होईल.
Ans: कोमट पाण्यात लिंबू, दालचिनी, बडीशेप किंवा आले यांसारख्या पदार्थांचा वापर केला जातो. मात्र हे उपाय केवळ पूरक असतात; वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत.
Ans: नाही. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली आवश्यक असते.
Ans: जास्त कॅलरीयुक्त आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, अपुरी झोप आणि हार्मोनल बदल यांमुळे पोटाची चरबी वाढू शकते.






