Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेनोपॉज नको गं बाई; चाळीशीतल्या महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या त्रासाचं कारण तरी काय ?

आजकाल बदलत जाणारी जीननशैली आणि आहारात होत चाललेले बदल याचा सर्वात जास्त परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर होत आहे. आजकाल पीसीओडी, पीसीओएस यांसारखं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 08:30 PM
मेनोपॉज नको गं बाई; चाळीशीतल्या महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या त्रासाचं कारण तरी काय ?
Follow Us
Follow Us:
  • मेनोपॉजमध्ये काय काळजी घ्यावी?
  • मेनोपॉजची सामान्य लक्षणे
आजकाल बदलत जाणारी जीननशैली आणि आहारात होत चाललेले बदल याचा सर्वात जास्त परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर होत आहे. आजकाल पीसीओडी, पीसीओएस यांसारखं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. एवढंच काय तर हल्लीच्या काळात मुलींना वयाच्या आठव्या वर्षीच पाळी येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वायत येणारी पाळी आणि तितक्यात कमी वयात म्हणजे 35 किंवा 40 या वयोगटात मेनोपॉजचा सामना करावा लागत आहे. याचं नेमकं कारण काय ? यावर काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मेनोपॉज म्हणजे काय ?

वयाच्या 40 मध्ये मासिकपाळी बंद व्हायला सुरुवात होते. या काळाला मेनोपॉज असं म्हणतात. कधी तीन महिन्यांनी तर कधी सहा महिन्यांनी पाळी यायला लागली तर समजावं की ही मेनोपॉजची लक्षणं आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर वय वाढत गेल्यावर अंडाशयातील (ovaries) हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हळू हळू कमी होतात. त्यामुळे पाळी अनियमित होऊ लागते आणि शेवटी पूर्णपणे बंद होते.

वरवर जरी हे साधं सरळ वाटत असलं तरी महिलांच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असतो. या अनियमित पाळीमुळे स्वभावात काही बदल अचानक दिसून येतात. खरंतर आपलंच आपल्यााला जाणवत नाही की नेमकं होतंय काय ? अशा वेळी या महिला शारीरिक आणि मानसिक त्रासाने वैतागून जातात. शरीराचं दुखणं कळतं पण मनाचं दुखणं जाणवत नाही. त्यामुळे नेमकं होतंय काय ते ना जवळच्या माणसांना कळत ना त्या महिलेला कळत.

भारतीय महिलांच्या शरीरात ‘या’ कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता, वारंवार उद्भवतात गंभीर समस्या

मेनोपॉजची सामान्य लक्षणे

  • मेनोपॉजच्या काळात काही शारीरिक आणि मानसिक बदल जाणवू शकतात.
  • अचानक स्वभाव चिडतिडा होणं
  • रात्री झोपते जास्त घाम येणे
  • झोप न लागणे
  • चिडचिड किंवा मूड स्विंग्स
  • थकवा जाणवणे
  • त्वचा आणि केस कोरडे होणे
  • वजन वाढणे
  • कमजोर हाडं
  • सर्वसाधारण अशी लक्षणं महिलांमध्ये आढळतात.
याची कारणं जाणून घ्यायची झालीच तर कुटुंबात आई किंवा आजीला कमी वयात मेनोपॉज आला असेल, तर मुलींनाही तो लवकर येण्याची शक्यता जास्त असते.अंडाशयातील हार्मोन्सचे (इस्ट्रोजेन) उत्पादन अचानक कमी झाल्यास पाळी लवकर थांबू शकते. त्याचबरोबर जास्त प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, चुकीचा आहार आणि सततचा ताण यामुळेही मेनोपॉज लवकर येण्याची शक्यता असते.अतिशय कमी वजन किंवा पोषणाचा अभाव असल्यास हार्मोनल संतुलन बिघडून पाळी लवकर बंद होऊ शकते.

Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम

मेनोपॉजमध्ये काय काळजी घ्यावी?

  • मेनोपॉजनंतर आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
  • संतुलित आहार घ्या (दूध, दही, कॅल्शियमयुक्त पदार्थ)
  • नियमित व्यायाम करा
  • पुरेशी झोप घ्या
  • ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D घ्या.
सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मेनोपॉज हा आजारपण नाही, तर महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक क्रिया आहे. योग्य आहार, व्यायाम आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर हा काळही सहज आणि निरोगीपणे पार करता येतो.

 

 

 

Web Title: What is the reason for the increasing problems experienced by women in theirage of 40 during menopause

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • health
  • Periods

संबंधित बातम्या

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध
1

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

तुम्ही दिवसभराच्या आहारातून किती कॅलरीज घेता? वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आहे नेमके कॅलरी इनटेकचे गणित! समजून घ्या
3

तुम्ही दिवसभराच्या आहारातून किती कॅलरीज घेता? वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आहे नेमके कॅलरी इनटेकचे गणित! समजून घ्या

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.