Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टू गो ऑर नॉट टू गो? तुमचे शौचाचे वेळापत्रक तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते

Bowel Schedule: तुम्ही कधी एखाद्या आजाराच्या निदानासाठीची चाचणी करून घेतली असेल तर त्यात कदाचित तुम्हाला स्टूल टेस्ट अर्थात मलाच्या नमुन्याची चाचणी करून घ्यायलाही सांगण्यात आले असेल. याचे कारण मलामधून तुमच्या शरीराचे कार्य कसे चालले आहे याविषयी मोलाची माहिती मिळू शकते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 17, 2024 | 02:13 PM
बद्धकोष्ठता कसे ठरते त्रासदायक

बद्धकोष्ठता कसे ठरते त्रासदायक

Follow Us
Close
Follow Us:

तुमचे शरीर जे शौच बाहेर फेकते किंवा अनेक प्रकरणांमध्ये शौच वा मल बाहेर फेकण्यास नकार देते, त्यावरून डॉक्टरांना तुम्ही योग्य आहार घेत आहात किंवा नाही हे समजून घेण्यास मदत होऊ शकते. 

शौचाचे नियमित वेळापत्रक जपणे हे आपल्या सर्वांगिण स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. पण कॉन्स्टिपेशन (बद्धकोष्ठता वा मलावरोध) या पचनाशी निगडित समस्येमुळे प्रत्येकालाच हे जमत नाही व ही गोष्ट अनियमित व वेदनादायी शौचास कारणीभूत ठरू शकते. डॉ. रोनक ताटे, कन्सल्टन्ट-गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

बद्धकोष्ठता (Constipation)

कॉन्स्टिपेशनची समस्या

बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या हा संपूर्ण जगातील एक सार्वत्रिक प्रश्न बनला आहे. पण, इथे आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी की काही आरोग्यसमस्या कितीही सार्वत्रिक झाल्या तरीही त्यांना सर्वसामान्य किंवा अघातक समजता येत नाही. अशा समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण त्यांच्यावर पुरेसे आणि वेळच्यावेळी उपचार होणे गरजेचे असते. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींसह सर्वच प्रौढांना प्रभावित करणाऱ्या कॉन्स्टिपेशनच्या समस्येलाही ही बाब लागू होते. 

काय आहेत त्रास

बद्धकोष्ठता म्हणजे शौचास जाण्याची वारंवारता कमी होणे, शौचास जाताना त्रास होणे आणि शौचास खूप वेळ लागणे या अडचणींशी निगडित समस्या आहे हे खरेच आहे, पण त्याचबरोबर तिचा संबंध अपानवायू सरताना मोठा आवाज व दुर्गंध येण्याशी तसेच तितक्याच मोठ्याने ढेकर येण्याशीही आहे. हे सार्वजनिक ठिकाणी घडते तेव्हा ती व्यक्ती थट्टेचा विषय बनते व त्यामुळे तिच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो. 

हेदेखील वाचा – घरगुती उपाय केल्याने ३ दिवसात बरा होईल मूळव्याध, जुनाट बद्धकोष्ठता होईल बरी

बालपणातच सुरूवात

या त्रासाला बालपणापासूनच सुरूवात होते

कॉन्स्टिपेशनच्या त्रासातून जाणाऱ्या प्रौढ व्यक्तींपैकी 30 टक्क्यांहून अधिक व्यक्तींच्या बाबतीत पार बालपणामध्येच या स्थितीला प्रारंभ झाल्याचे पण तिच्या नकारात्मक परिणामांविषयी जागरुकता नसल्याने तिच्यावर उपचार न झाल्याचे दिसून येते. तीव्र स्वरूपाच्या कॉन्स्टिपेशऩवर दीर्घकाळ उपचार न केल्यास त्याची परिणती पाइल्स (मूळव्याध), फिशर (गुदद्वाराला भेगा), फिस्टुला (भगंदर), हर्निया (अंतर्गळ) आणि रेक्टल प्रोलॅप्स (गुदाशय खाली येणे) या समस्यांमध्ये होऊ शकते, ज्यासाठी शस्त्रक्रियात्मक उपचार करावे लागतात. 

महिलांमध्ये गरोदरपणा आणि मासिक पाळीमुळे अंतर्स्त्रावांच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात व त्यामुळे त्यांच्या बॉवेल मूव्हमेंटवर परिणाम होऊ शकतो, पण बरेचदा थोड्याफार उपचारांनी हा प्रश्न सुटतो. त्यानंतरही कॉन्स्टिपेशन दूर झाले नाही तर मात्र लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. 

काय सांगते निरीक्षण

ताज्या निरीक्षणांमधून असे दिसून आले आहे की, बद्धकोष्ठतेसारख्या उदरांत्राच्या कार्यामध्ये अडथळा आणणाऱ्या समस्यांचा संबंध इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजिज (IBD), पार्किन्सन्स डिजिज, डिप्रेशन (नैराश्य) व डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) यांच्याशीही असू शकतो. कॉन्स्टिपेशनची समस्या सुरू होणे हे कोलन (मोठ्या आतड्याच्या) कॅन्सरचेही चिन्ह असू शकते. 

जर जास्त संख्येने लोकांनी कॉन्स्टिपेशनवरील योग्य उपचार घेतले तर त्यांच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये प्रचंड सुधारणा होऊ शकते आणि शस्त्रक्रियात्मक उपचारांचे प्रमाण कमी होईल; यातून अनेकांच्या बाबतीत मोठ्या आतड्याच्या कर्करोगांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होऊ शकेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

हेदेखील वाचा – 30 मिनिटात साफ होईल पोट, बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय ठरले रामबाण

काय ठरते कारणीभूत 

बद्धकोष्ठता आजार का होतो

बहुतांश वेळा बद्धकोष्ठता हे बैठ्या जीवनशैलीचे प्रतिक बनून गेलेले दिसते, ज्यात लोकांना बाहेरचे वाईट प्रकारे बनविलेले, निकस अन्न खाण्याची आवड असते. आहार, झोप, ताणतणाव, व्यायामाचा अभाव इत्यादी जीवनशैलीशी निगडित अऩारोग्यकारक सवयींचा संबंध अपचन, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि छातीत दुखणे या लक्षणांशी असते. आपल्या आहारात फायबर आणि पुरेसे द्रवपदार्थ यांचा समावेश असणे गरजेचे असते, या दोन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात नसतील तर शौचाचे वेळापत्रक पाळणे अधिक कठीण जाते. 

काय करावे

असे असले तरीही बरेचदा, कॉन्स्टिपेशनची समस्या एखाद्या अधिक खोलवर दडलेल्या समस्येकडे निर्देश करते व कॉन्स्टिपेशनविषयी जागरुकता निर्माण करण्यात न आल्यास ही समस्या उपचाराविना दुर्लक्षित राहून जाऊ शकते. कॉन्स्टिपेशनचा त्रास असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी तथाकथित “लाइफस्टाइल मॅनेजमेंट”साठीचे उपाय सांगणारे कितीतरी व्हिडिओज आणि जाहिरातील सोशल मीडियावर पहायला मिळतात, पण त्यांनी दिलेले सल्ले फारशा गांभीर्याने न घेतलेलेच बरे. 

दीर्घकाळापासून असलेले बद्धकोष्ठता किंवा पोट व आतड्याच्या समस्यांवर लवकारत लवकर उपचार करायला हवेत. आपले शौचाचे वेळापत्रक आपल्या शरीराच्या कार्याविषयी बरेच काही सांगतात आणि ते सांगणे आपण ऐकायला हवे. ‘हेल्थ इज वेल्थ’ आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे वाक्य केवळ म्हणीपुरते मर्यादित राहता कामा नये.

Web Title: What your bowel schedule says about your health know about constipation problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health
1

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा
2

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल
3

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
4

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.