
थंडीच्या दिवसांमध्ये केस धुवण्यासाठी कोणते पाणी वापरावे? 'या' पद्धतीने घ्या केसांची काळजी
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट शरीर, त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर होण्याची जास्त शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केस सुद्धा खूप जास्त कोरडे होऊन जातात. केसांचे आरोग्य बिघडल्यानंतर सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा हेअर वॉश करणे आवश्यक आहे. केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुतल्यास टाळूवरील घाण आणि कोंडा कमी होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये गारठ्यामुळे गरम पाण्याची अंघोळ केली जाते. पण बऱ्याचदा केस स्वच्छ करण्यासाठी थंड की गरम पाण्याचा वापर करावा, यात महिला खूप जास्त गोंधळून जातात. काहींना वाटत थंड पाणी प्रभावी आहे तर काहींना वाटत गरम पाणी प्रभावी आहे. चुकीच्या पद्धतीने केस धुतल्यास केसांची गुणवत्ता खराब होऊन केसांची पोत बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या पाण्याचा वापर केल्यास केस झाडूसारखे अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांमध्ये फ्रिजीनेस वाढून केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. आपल्यापैकी अनेक महिला केस धुवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात. पण डॉक्टरांच्या मते केस स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर केल्यास केसांचे आरोग्य आणि चमक कायम टिकून राहत नाही. केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. तसेच केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊन केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. पण थंड पाण्याचा वापर करून केस धुतल्यास केसांना कोणतीही हानी पोहचत नाही. केसांमधील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर दिसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केस धुवण्यासाठी थंड की गरम कोणत्या पाण्याचा वापर करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त थंड आणि खूप जास्त गरम पाण्याचा वापर केल्यास केसांच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. थंडीत केस धुवण्यासाठी प्रामुख्याने कोमट पाण्याचा वापर करावा. अतिथंड किंवा अतिगरम पाणी वापरू नये. ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान असलेले कोमट पाणी केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही आणि केस कायमच सुंदर राहतात.
हिवाळ्यात आठवड्यातून दोनदाच केस धुवावे. जास्त वेळा केस धुवू नये. कारण यामुळे डोकेदुखी किंवा सर्दी होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार केस धुतल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते आणि केस अतिशय रुक्ष होतात. केस धुवण्यासाठी मॉइश्चरायझिंग शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा. शाम्पूचा वापर करून केस धुतल्यास शेवटी थंड पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याच्या वापरामुळे क्यूटिकल्स बंद होण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांमध्ये केसांना हर्बल तेलाने मसाज करावा. हर्बल तेल केसांसाठी अतिशय गुणकारी ठरते . रात्री झोपण्याआधी केसांना तेल लावून हलक्या हाताने मालिश करावी. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसांच्या समस्या उद्भवत नाही. केसांची काळजी घेताना कोमट पाण्याने केस धुवावे. केसांसाठी कोमट पाणी प्रभावी ठरते.
Ans: हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते आणि हवा खूप कोरडी असते. यामुळे आपल्या त्वचेप्रमाणेच केसांमधील नैसर्गिक ओलावा देखील कमी होतो.
Ans: आठवड्यातून फक्त दोनदा केस धुणे पुरेसे आहे.
Ans: हिवाळ्यात केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे.