केसांची वाढ खुंटली आहे? मग ताज्या जास्वदींच्या फुलांचा 'या' पद्धतीने करा वापर
सर्वच महिलांना लांबलचक सुंदर आणि मजबूत केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी हेअर ऑइल लावून केसांची काळजी घेतली जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअरचा वापर करून केस चमकदार केले जाते. केसांची गुणवत्ता आणि पोत सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण तरीसुद्धा केस चमकदार आणि सुंदर दिसत नाही. केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने केस अतिशय कोरडे होऊन केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. केसांची वाढ खुंटल्यानंतर केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची खुंटलेली वाढ पुन्हा होण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
जास्वदींच्या फुलांना धार्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्व आहे. देवाच्या पूजेसाठी ही फुले प्रामुख्याने वापरली जातात. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली जास्वदींची फुले केसांसाठी प्रभावी ठरतात. यामध्ये नैसर्गिकरित्या अमिनो एसिड्स आढळून येते. ज्यामुळे केसांना केराटीन नावाच्या प्रोटीन्सची निर्मिती होते आणि केस मुलायम दिसतात. जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले पोषक घटक केसांची गुणवत्ता सुधारून केसांच्या मुळांना भरपूर पोषण देतात आणि केसांची वाढ होण्यास मदत करतात.
टाळूवर वाढलेले फॅगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी जास्वदींच्या फुलांचा वापर करावा. तसेच टाळूवरील पीएच पातळी संतुलित ठेवण्यासाठी जास्वदींचा वापर करावा. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी कोणत्याही ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून केसांमधील कोंडा कमी करावा. जास्वदींचे फुल केसांसाठी नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते.
टोपात खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात जास्वदींची फुले आणि पाने घालून मंद आचेवर शिजवून घ्या. फुलांचा रंग खोबऱ्याच्या तेलाला उतरल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले तेल थंड होण्यासाठी ठेवा. तेल थंड झाल्यानंतर टाळूवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळेल आणि केस अतिशय चमकदार होतील. तेल लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारेल आणि केसांची झपाट्याने वाढ होईल. तसेच जास्वदींच्या फुलांचा हेअरमास्क आठवड्यातून एकदा केसांवर लावल्यास केस सुंदर आणि मुलायम होतील






