
बदाम खाण्याने किडनीवर होतो परिणाम, मुतखड्याचे कारण
बदामामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि फायबर भरपूर असतात, जे अनेक आरोग्यदायी फायदे देतात. यामध्ये हृदयाला बळकट करण्यापासून ते रक्तदाब कमी करण्यापर्यंत आणि कर्करोगाचा धोका या सर्व गोष्टींचा समावेश आहे. तथापि, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की बदामाचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत बदामाचे सेवन करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, विशेषत: ज्यांना किडनीचा त्रास आहे किंवा मुतखडा आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनने केलेल्या अभ्यासानुसार, जास्त बदाम खाणे हे किडनीच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. याचा नक्की किडनीवर कसा परिणाम होतो आणि दिवसातून किती बदाम खाणे शरीरासाठी योग्य ठरते, याबाबत आपण अधिक माहिती मिळवूया. बदामामुळे किडनीवर कसा परिणाम होतो हे आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
बदाम कसा ठरतो कारणीभूत
बदाम खाणे कसे ठरते त्रासदायक
बदामामध्ये ऑक्सलेट्स असतात जे कॅल्शियमसोबत एकत्र येऊन किडनी स्टोन तयार करतात. जर हे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते किडनी स्टोनसारखे दिसतात. विशेषत: अशा लोकांमध्ये ज्यांना हायपरॉक्सॅलुरियाची समस्या आहे, म्हणजेच लघवीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त आहे. यामुळेच किडनी स्टोन अर्थात मुतखडा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याचा त्रासही होतो. यामुळे ज्यांना बदाम खायची सवय आहे त्यांनी त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटून बदाम खाणे थांबवा
सकाळीच उपाशीपोटी बदाम आणि बेदाणे खाण्याने मिळतात Magical फायदे, जाणून घ्या तथ्य
बदाम किती खावेत?
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की प्रौढांसाठी दररोज 20-23 बदाम खाणे सुरक्षित आहे. तथापि, किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. किडनीची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात बदाम खाऊ नयेत कारण याचा परिणाम खूपच खराब होऊ शकतो
हे पदार्थही टाळावेत
कोणते पदार्थ खाणे टाळावे
डॅमेज लिव्हर; सडलेली किडनी, डायलिसिस आणि शरीरातून घाणेरडे पाणी शोषून काढेल देशी उपाय, 10 पदार्थांचा करा समावेश
मुतखडा कसा कमी करावा
मुतखडा कमी करण्याचे उपाय
दररोज किमान 2.5 लिटर पाणी पिणे आणि कमी मिठाचा आहार घेतल्यास किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो. संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाण्यासोबत बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु ते जास्त प्रमाणात खाऊ नका. जास्त त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांना जाऊन भेटणे आवश्यक आहे. किडनी स्टोनचा त्रास असल्यास डॉक्टरांनी दिलेला सल्ला न चुकता ऐका आणि कधीही बदामाचे सेवन करू नका हे लक्षात ठेवा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.