दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
सुंदर हास्य कोणत्याही व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवण्याचे आणि सौंदर्य वाढवण्याचे काम करते. पण जेव्हा दातांवर पिवळे डाग दिसू लागतात तेव्हा कधीकधी आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. पिवळ्या दातांमुळे लोक इतरांसमोर हसण्यास लाजतात. इतकंच काय आपल्याला जवळच्या माणसांशीही बोलायची लाज वाटते.
पिवळे दात अनेक कारणांमुळे होऊ शकतात जसे की योग्यरित्या ब्रश न करणे, चहा-कॉफी आणि तंबाखूचे जास्त सेवन करणे, कॅल्शियमची कमतरता आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी. पण, एकदा दातांवर पिवळा थर दिसला की, आत्मविश्वास कमी होतो. तसेच, सार्वजनिक ठिकाणी इतरांकडून त्यांची चेष्टा केली जाण्याची किंवा त्यांच्यावर टीका होण्याची भीती असते.
पण लाजून काय होणार? उलट यासाठी तुम्हाला आवश्यक पावले उचलावी लागतील. जरी बाजारात दात स्वच्छ करण्यासाठी आणि ते पांढरे करण्यासाठी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही घरगुती उपायांच्या मदतीने दातांचा पिवळापणा दूर करू शकता. आम्ही तुम्हाला असे ४ उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमचा आत्मविश्वास पुन्हा परत येईल. (फोटो सौजन्य – iStock)
दात सफेद करण्याचे उपाय
आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा या एक आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञ आहेत आणि त्या नेहमीच इंस्टाग्राम हँडलवर लोकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता आणि त्यापासून मुक्त होण्याचे उपाय शेअर करतात. दरम्यान, दात पांढरे करण्यासाठी काही घरगुती उपाय त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्राचीन उपाय केवळ दात पांढरे करण्यास मदत करत नाहीत तर हिरड्यांच्या आरोग्यासाठी आणि तोंडाच्या डिटॉक्सिफायरमध्ये देखील मदत करतात, तेदेखील घाणेरड्या रसायनांशिवाय.
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
हळद आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण
हळद + नारळाचे तेल = उत्तम कॉम्बिनेशन
तुम्ही हळद आणि नारळाच्या तेलाच्या मिश्रणाने दात घासू शकता. सर्वप्रथम, थोडीशी सेंद्रिय हळद घ्या. त्यात अँटीइन्फ्लेमेटरी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. त्यानंतर, त्यात थोडे नारळाचे तेल घाला, ज्यामध्ये नैसर्गिक स्वच्छता गुणधर्म आहेत. हे मिश्रण चांगले मिसळा आणि दातांवर हलक्या हाताने घासा. यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते.
ऑईल पुलिंग
ऑईल पुलिंगची सवय लावा
दात पांढरे करण्यासाठी तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता. यासाठी, एक चमचा तीळ तेल किंवा नारळ तेल घ्या, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. ते तोंडात साधारण ५ ते १५ ठेवा आणि त्यानंतर तोंंड स्वच्छ धुवा. यामुळे तोंडात असलेले हानिकारक बॅक्टेरिया, प्लेक आणि अडकलेले अन्न कण काढून टाकण्यास मदत होते. यामुळे दातांवरील डागदेखील दूर होतात. यानंतर, कोमट पाण्यात हळद आणि मीठ मिसळा आणि गुळण्या करा.
कॅल्शियम बेंटोनाईड क्ले
क्ले चा करा वापर
दातांच्या पृष्ठभागावरील प्लेक आणि डाग काढून टाकण्यासाठी कॅल्शियम बेंटोनाइट क्ले किंवा चारकोलदेखील वापरता येते. हे दोन्ही दात स्वच्छ करण्यासाठी प्रभावी मानले जातात. यामुळे तुम्ही तुमचे दात लवकर स्वच्छ करू शकता आणि दातांची चमकही राखू शकता.
दातांवरील पिवळ्या थरामुळे हसणं होतंय कठीण? सोपा घरगुती उपाय चमकवेल दात हिऱ्यासारखे
बेकिंग सोड्यासह स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोडा मिक्स करा
लोक सहसा दात स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरतात, परंतु ते दातांच्या इनॅमलसाठी थोडेसे घासणारे ठरू शकते. यावर उपाय म्हणजे संपूर्ण स्ट्रॉबेरी चांगली मॅश करा आणि त्यात थोडा बेकिंग सोडा घाला. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड असते, जे तुमच्या दातांवरील डाग काढून टाकण्यास मदत करू शकते. याचा तुम्ही योग्य वापर करून घेऊ शकता
आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञांचा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.