
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Why Does Eating Sweets Make To Sleep : आपल्याला गोड खाण्याची खवय असते. प्रत्येक सणा सुदीला आपण गोड मिठाई किंवा चाॅकलेट खात असतो. पण तुम्हाला माहित आहे का की गोड खल्याने आपल्याला लगेच झोप किंवा आळस का येतो ते ? गोड पदार्थ खल्याने आपल्या शरिरातील इन्सुलिन आणि रक्तातील पातळी वाढते या सर्व प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत फूड क्रोमा असे म्हणतात. हे दोन्ही घटक जेंव्हा आपल्या शरिरात जातात तेव्हा आपल्याला झोप किंवा आळस येत असतो. गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नसली तरी प्रमाणावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. आहारात प्रोटीन, फायबर आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्याने जेवण अधिक संतुलित ठेवण्यास मदत होते. गोड खाल्ल्यानंतर काही वेळ हलकं चालणंही उपयोगी ठरू शकतं.
गोड खल्यानंतर आपल्या शरिरात साखरेचे प्रमाण वाढते, जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी (Glucose) अचानक वाढलेली असते. शरिरात वाढलेल्या साखरेला नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंड (Pancreas) मोठ्या प्रमाणात इन्सुलिन संप्रेरक सोडते. आपल्या शरिरातील इन्सुलिन रक्तातील साखर वेगाने कमी करते. साखरेची पातळी अचानक खालावल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते. मग आपल्याला थकवा किंवा झोप जाणवू लागते.
या सर्वांसाठी आपण आपल्या शारीरिक वाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, आपल्या पचन क्रियेवर लक्ष दिले पाहिजे, भावनिक समतोल मग त्यात ताण तणाव यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, तर आपल्या लैगिंक प्रजनन चक्राचे नियम पाळणे गरजेचे आहे.