Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी

Diwali Sugar Free Sweets Recipes: दिवाळी म्हटलं की घरात गोडाचा वास यायलाच पाहिजे. लाडू, बर्फी, हलवा, पेढा... सगळं ताट भरलेलं असतं. पण घरात जर कोणाला डायबिटीस असेल तर त्यांचं काय? सगळे गोड खातायत आणि त्यांनी फक्त बघत बसायचं? हे तर फार वाईट वाटतं.पण काळजी करू नका. साखर नाही टाकली तरी गोड पदार्थ बनू शकतो. खजूर, गूळ, खोबरं, ड्रायफ्रूट्स यातूनच नैसर्गिक गोडवा येतो. या दिवाळीत घरच्यांसाठी अशा 5 मिठाया बनवा, ज्या डायबिटीस असलेले पण आरामात खाऊ शकतील.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 06, 2026 | 11:42 AM

Diwali Sugar Free Sweets Recipes: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 6

नारळाचे लाडू हे लाडू बनवायला सगळ्यात सोपे आहेत.आधी एका भांड्यात थोडं दूध गरम करून बाजूला ठेवा. आता कढईत दोन चमचे तूप टाका. त्यात किसलेलं खोबरं टाकून छान खरपूस भाजून घ्या. खोबरं भाजलं की त्यात किसलेला गूळ टाका आणि सतत ढवळत रहा. गूळ पूर्ण विरघळला की त्यात वेलची पूड आणि चिरलेले बदाम टाका.गॅस बंद करा. मिश्रण थोडं कोमट झालं की हाताला थोडं तूप लावा आणि छोटे छोटे लाडू वळा. झाले तयार. घरभर वास सुटेल.

2 / 6

शाही बर्फी नाव शाही आहे पण बनवायला एकदम सोपी.बदाम, अक्रोड, काजू, अंजीर आणि खजूर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता कढईत थोडं तूप गरम करा. त्यात अंजीर आणि खजूर टाकून थोडा वेळ शिजवा. मग त्यात बारीक केलेला सुकामेवा टाकून सगळं एकत्र करा.हे मिश्रण तूप लावलेल्या ताटात पसरवा. थंड झाल्यावर त्याच्या चौकोनी वड्या कापा. ही बर्फी खायला तर भारी लागते, शिवाय ताकद पण देते.

3 / 6

मूग डाळ हलवा थंडीच्या दिवसात गरम गरम हलवा खायला कोणाला आवडणार नाही?आधी मूग डाळ 2-3 तास भिजवून वाटून घ्या. कढईत तूप गरम करा आणि त्यात ही वाटलेली डाळ टाका. मंद आचेवर डाळ छान भाजून घ्या, घाई करू नका. डाळ भाजली की त्यात थोडं पाणी टाकून शिजू द्या. डाळ मऊ झाली की त्यात गूळ टाका आणि नीट मिक्स करा.शेवटी वरून बदाम, बेदाणे, काजू, मखाना आणि अक्रोड टाका. गरम गरम हलवा खायला तयार.

4 / 6

खजूर पेडा खजूर म्हणजे साखरेचा नैसर्गिक पर्याय.आधी खजुरातल्या बिया काढून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा. कढईत तूप गरम करून त्यात ही पेस्ट टाका. मंद आचेवर भाजत रहा. पेस्ट थोडी घट्ट झाली की त्यात चिरलेले बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड टाका.मिश्रण थंड झालं की त्याचे छोटे गोळे करा आणि पेढ्याचा आकार द्या. वरून एखादा पिस्ता लावा म्हणजे दिसायला पण छान दिसेल.

5 / 6

दुधीचा हलवा म्हटलं की नाक मुरडणारे पण खूप असतात, पण हा हलवा खाल्ला की परत मागतील.कढईत तूप गरम करा, त्यात किसलेला दुधी भोपळा टाका. त्यात दूध टाकून भोपळा छान शिजवून घ्या. भोपळा शिजला की त्यात खवा आणि गूळ टाका आणि सतत ढवळत रहा. सगळं पाणी आटलं की वरून आवडीचा सुकामेवा टाका.

6 / 6

या दिवाळीत असं करू नका की डायबिटीस आहे म्हणून गोडच खायचं नाही. थोडं प्रमाणात, योग्य पदार्थ खाल्ले तर सणाचा आनंद सगळ्यांना घेता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गूळ आणि खजूर जरी नैसर्गिक असले तरी ते पण जास्त खाऊ नका. डॉक्टरांना विचारूनच खा.या दिवाळीत तुम्ही कोणती मिठाई बनवणार आहात?

Web Title: Sugar free diwali sweets recipes for diabetics rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Diabetics
  • Diwali 2026
  • healthy food
  • sweets

संबंधित बातम्या

Diwali 2026: दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना करू नका या चुका, जाणून घ्या महत्त्व आणि नियम
1

Diwali 2026: दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना करू नका या चुका, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी
2

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी

Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सावधानतेचा इशारा; ६४ कोटींचा अन्नसाठा जप्त
3

Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सावधानतेचा इशारा; ६४ कोटींचा अन्नसाठा जप्त

Lakshmi Pujan: गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील नियम
4

Lakshmi Pujan: गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.