Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात का वाढतो Fungal Infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळवण्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा इन्फेक्शन वाढून पायांच्या समस्या आणखीनच वाढतात. चला तर जाणून घेऊया फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2026 | 07:59 AM
पावसाळ्यात का वाढतो Fungal infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

पावसाळ्यात का वाढतो Fungal infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
पायांच्या संसर्गाची लक्षणे?
बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय?

उन्हाळा ऋतू संपल्यानंतर सगळेच पावसाच्या प्रतिक्षेत असतात. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरणात निर्माण होते आणि वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळतो. पावसात थंडावा वाढतो, पण शरीरसंबंधित गंभीर आजारांचा धोका सुद्धा तेवढाच असतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप, साथीच्या आजारांसोबतच त्वचेसंबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात. बुरशीजन्य आजार झाल्यामुळे त्वचेवर डाग किंवा लाल चट्टे येऊन त्वचा पूर्णपणे लाल होऊन जाते. पावसाळ्यात हवेमध्ये खूप जास्त आर्द्रता असते. दमट वातावरणामुळे खूप जास्त घाम येतो आणि त्वचा चिकट, तेलकट होऊन जाते. सतत येणाऱ्या घामामुळे कपडे किंवा बूट बराच वेळ ओले राहतात. ओलसरपणा वाढल्यामुळे पायांच्या त्वचेला खाज येते तर काहीवेळा जखमा सुद्धा होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

रक्तदानापासून रक्त चढवण्यापर्यंत! प्रत्येक रक्ताच्या युनिटला सुरक्षित बनवणाऱ्या चाचण्या, जाणून घ्या सविस्तर माहिती

खड्यांमध्ये साचून राहिलेल्या पाण्यात विषाणू आणि जिवाणू मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. चुकून खड्यातील पाण्यात पाय पडल्यास संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींच्या पायावर लगेच जखमा होऊन पाय खराब होतो. काहीवेळा पायांवर झालेल्या जखमांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. यामुळे त्वचेसंबंधित गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. खाज सुटणे, लाल पुरळ उठणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय? बुरशीजन्य संसर्गची लक्षणे कोणती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पायांवरील जखमा लवकर बऱ्या होतील.

बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय?

बुरशीजन्य संसर्ग बुरशीमुळे होतो. याचा परिणाम त्वचा, नखे, केस, तोंड आणि शरीराच्या इतर भागांवर सुद्धा होण्याची जास्त शक्यता असते. बुरशी उबदार आणि दमट वातावरणात झपाट्याने वाढते. त्यामुळे बुरशी वाढण्यासाठी पावसाळा ऋतू पोषक ठरतो. त्यामुळे बुरशीजन्य संसर्गची लागण झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. सोशल मीडिया किंवा इतर कुठेही पाहिलेल्या गोळ्या, क्रीम न घेता योग्य ते उपचार करावेत.

बुरशीजन्य संसर्गाची लक्षणे:

  • त्वचेवर लालसर पुरळ उठणे
  • अंगाला खाज येणे
  • जळजळ किंवा टोचल्यासारखी संवेदना होणे
  • त्वचा तडकणे किंवा सोलवटणे
  • पायांना दुर्गंधी येणे
  • नखे पिवळी पडणे आणि जाड होणे
  • तोंडात पांढरे डाग पडणे.
वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

बुरशीजन्य संसर्ग झाल्यानंतर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस संसर्ग टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण वारंवार उद्भवलेला त्वचा संसर्ग वेगाने पसरण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण मधुमेहाच्या रुग्णांना झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कुठेही जाऊन आल्यानंतर सर्वप्रथम पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. संपूर्ण शरीर कोरडे असणे आवश्यक आहे. नियमित अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास पायांवर वाढलेल्या जखमा हळूहळू बऱ्या होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका का वाढतो?

    Ans: पावसाळ्यात हवेत आर्द्रता (Humidity) वाढते. घाम, ओलसर कपडे, पावसाचे पाणी आणि त्वचेवर सतत राहणारा ओलावा यामुळे बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते.

  • Que: फंगल इन्फेक्शनची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: त्वचेवर खाज येणे, लालसर किंवा गोलाकार चट्टे दिसणे, त्वचा सोलणे, जळजळ होणे, पुरळ येणे किंवा त्वचेचा रंग बदलणे.

  • Que: शरीराच्या कोणत्या भागांमध्ये फंगल इन्फेक्शन जास्त दिसून येते?

    Ans: पायांची बोटे, काखा, मान, जांघा, त्वचेच्या घड्या, बगल आणि सतत ओलसर राहणारे भाग याठिकाणी फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.

Web Title: Why does the risk of fungal infections increase during the monsoon do not ignore these skin related symptoms at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 07:59 AM

Topics:  

  • fungal infection
  • infections
  • monsoon care

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचे सेवन
1

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचे सेवन

ऑफिस आणि मॉलमधील हँड ड्रायर वापरताय? जाणून घ्या आरोग्यावर होणारे  दुष्परिणाम
2

ऑफिस आणि मॉलमधील हँड ड्रायर वापरताय? जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू
3

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू

पावसाळ्यात कायमच पोटात जडपणा जाणवतो? मग नियमित करा ‘या’ काढ्याचे सेवन, आतड्यांमधील गॅस पडून जाईल बाहेर
4

पावसाळ्यात कायमच पोटात जडपणा जाणवतो? मग नियमित करा ‘या’ काढ्याचे सेवन, आतड्यांमधील गॅस पडून जाईल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.