Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या

नुकत्याच समोर आलेल्या ट्रॅव्हल ऍडव्हायजरीमध्ये भारतीय पर्यटकांना काही देशांमध्ये प्रवास करायला सक्त मनाई करण्यात आली आहे. पण असं का आणि यामागे नेमकं कोणतं कारण आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2025 | 08:40 AM
भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सध्या थायलंड-कंबोडिया सीमेवरील वाढत्या तणावामुळे जगभरातील अनेक देशांनी प्रवास सल्ला (Travel Advisory) जारी केला आहे. थायलंडमधील भारतीय दूतावासानेही थायलंड आणि कंबोडिया सीमेच्या आसपास भारतीय नागरिकांनी प्रवास टाळावा, अशी सूचना दिली आहे. ही पहिली वेळ नाही की भारत सरकारने अशा प्रकारचा सल्ला दिला आहे. यापूर्वीही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण, इस्रायल आणि काही अशांत देशांबाबत भारतीयांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता.

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या

या सल्ल्यांचे मुख्य कारण म्हणजे या देशांमधील अस्थिर सुरक्षा परिस्थिती, हिंसाचार, दहशतवादी हालचाली, तसेच प्रशासनातील कमकुवतपणा. आज आपण अशाच 7 देशांविषयी माहिती घेणार आहोत जिथे भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला दिला गेला आहे.

1. कंबोडिया
इथे भारतीयांना फसव्या नोकरीच्या ऑफर देऊन त्यांची फसवणूक केली जाते. अनेक भारतीयांनी अशा बनावट ऑफरवर विश्वास ठेवून शोषण सहन केलं आहे. त्यामुळे दूतावासाने अशा ऑफरची सत्यता तपासूनच निर्णय घ्यावा आणि कायम दूतावासाशी संपर्कात राहावे, असे सांगितले आहे. शिवाय थायलंड-कंबोडिया सीमारेषेवरील तणावामुळे त्या भागात प्रवास करणे टाळावे.

2. म्यानमार
इथे अनेक भागांमध्ये, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु आहेत. तसंच इंटरनेट व संपर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे भारतीयांना इथे प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे नागरिक आधीच तिथे आहेत त्यांनी धोकादायक भागांपासून दूर रहावे व दूतावासात नोंदणी करावी.

3. इराक
इराकमध्ये सातत्याने हिंसा आणि दहशतवादाचा धोका असतो. तसंच तिथे आपत्कालीन सेवा फारच मर्यादित आहेत. त्यामुळे सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे भारतीयांनी तिथे प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

4. सीरिया
इथे सशस्त्र संघटनांच्या क्रिया सुरुवात आहेत. शहरांमधील प्रवास अत्यंत धोकादायक असून रस्त्यांवर अनेक वेळा स्फोटक उपकरणे सापडतात. त्यामुळे भारतीय नागरिकांनी सीरियात प्रवास पूर्णपणे टाळावा.

5. लिबिया
लिबियामध्येही सशस्त्र गट सक्रिय असून परिस्थिती अत्यंत असुरक्षित आहे. प्रवास करताना धोका अधिक आहे कारण रस्त्यांवर स्फोटकांचा धोका असतो. भारत सरकारने नागरिकांना लिबियामध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी

6. लेबनान
सध्या लेबनानमध्ये वाढता तणाव, स्फोट, आणि सुरक्षेचा अभाव आहे. हिंसाचारग्रस्त भागांमध्ये विशेषत: जीवितास धोका आहे. जे भारतीय नागरिक आधीच लेबनानमध्ये आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि भारतीय दूतावासाशी संपर्कात रहावे.

7. बांगलादेश
येथील राजकीय अस्थिरता आणि आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत निषेध, मोर्चे सुरू असल्याने भारत सरकारने प्रवास टाळावा अशी सूचना दिली आहे. जे लोक तिथे आधीच आहेत, त्यांनी सावधगिरी बाळगून केवळ सुरक्षित भागातच प्रवास करावा.

सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मूलमंत्र आहे. कोणत्याही देशात प्रवासापूर्वी स्थानिक परिस्थितीची माहिती घ्या आणि आवश्यक असल्यास दूतावासाशी संपर्क साधा.

FAQs (संबंधित प्रश्न)

ट्रॅव्हल ऍडव्हायजरी का आहे?
उपस्थित असलेले कोणतेही विशिष्ट धोके ओळखता यावेत म्हणून…

भारतात कोणत्या लेव्हलची ट्रॅव्हल ऍडव्हायजरी आहे?
अमेरिकन सरकारने भारतासाठी लेव्हल २ ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी केला आहे.

 

Web Title: Why indians are advised not to visiting these 7 countries read the travel advisory for foreign tourism and make the right decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • travel news
  • travel tips
  • world

संबंधित बातम्या

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
1

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती
2

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती

भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?
3

भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा
4

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.