लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात?
मागील अनेक वर्षांपासून चालत्या आलेल्या परंपरा अजूनही आवडीने फॉलो केल्या जात आहेत. ताटात वाढलेले जेवण जेवण्यासाठी अनेक लोक चमचा, काटा किंवा सुरीचा अतिशय सहजपणे वापर करतात. पण भारतीय लोक जेवण कायमच हाताने जेवतात. ताटात कोणताही पदार्थ वाढल्यानंतर तो हातानेच खाल्ला जातो. हल्लीच्या आधुनिक जगात भारतमध्ये हाताने जेवण्याची परंपरा कायम टिकून आहे. हाताने जेवण्याची सवय केवळ घरातच नाहीतर इतर ठिकाणी बाहेर फिरायला गेल्यानंतर सुद्धा हातानेच अन्नपदार्थ खाल्ले जातात. अन्नपदार्थ हाताने जेवल्यामुळे आरोग्य, संस्कृती, मानसिक समाधान आणि सामाजिक बंध टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हाताने जेवल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
मानवी शरीरात असंख्य स्नायू आणि हाडे असतात. हातांच्या बोटांमधील स्नायू मेंदूला जोडलेले असतात. हाताने अन्नपदार्थांना स्पर्श केल्यानंतर त्या संवेदना मेंदूपर्यंत थेट पोहचतात. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते. हातांमधील उब आणि हलक्या दाबामुळे अन्नातील रसास्रव होण्यास मदत होते. ज्यामुळे शरीर जेवलेले अन्नपदार्थ सहज तोडून घेते. या प्रक्रियेमुळे शरीराला खाल्ले अन्नपदार्थ सहज शोषून घेण्यास मदत होते. पचनक्रियेमध्ये कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत.
लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात?
बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक लोक चमच्याने जेवतात. यामुळे शरीराला किती अन्नाची आवश्यकता आहे, हे बऱ्याचदा समजून येत नाही. त्यामुळे कायमच हाताने जेवण जेवावे. तसेच आहारात अतितिखट, तेलकट किंवा भरपूर प्रमाणात अन्नपदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आहारतज्ञांच्या मते, कायमच निरोगी राहण्यासाठी हाताने अन्नपदार्थ खावेत.
काहींना हाताने अन्नपदार्थ खाताना अस्वच्छता वाटू लागते. त्यामुळे जेवणाआधी कायमच हात स्वच्छ धुवणे अतिशय महत्वाचे आहे. जेवणाच्या ताटावर बसण्याआधी हँडवॉश किंवा घरातील कोणत्याही साबणे हात धुवावे. पूर्वीच्या काळी अनेक घरांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाची पाने आणि राखचा वापर केला जात होता.
हाताने जेवण का जेवावे?
हाताने जेवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचन सुधारते, अन्न नीट चघळले जाते आणि खाण्याची जाणीव वाढते. तसेच, हाताच्या बोटांच्या ऍक्युप्रेशरमुळे रक्ताभिसरण सुधारते.
हाताने जेवण्याचे फायदे:
आयुर्वेदानुसार, आपल्या हाताच्या बोटांमध्ये पाच तत्वे (अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल) असतात, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते. हाताने जेवताना आपण अन्नाची चव, पोत आणि सुगंधावर अधिक लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे खाण्याची जाणीव वाढते आणि जास्त खाणे टाळता येते.