शरीरात निर्माण झालेली ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीरासाठी सर्वच घटक अतिशय महत्वाचे आहेत. न, कॅल्शियम आणि लोह इत्यादी घटकांचा महत्वाचा भाग म्हणजे ओमेगा-3 फॅटी अॅसिड. ओमेगा-3 फॅटी अॅसिड शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. या घटकाची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, थकवा, सांधेदुखी, डोळ्यांचा कोरडेपणा, झोपेची समस्या, मूडमध्ये बदल, एकाग्रता कमी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिड कमी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओमेगा-3 फॅटी अॅसिड वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
World ORS Day 2025: ओआरएसचा इतिहास, महत्त्व आणि माहिती, काय सांगतात तज्ज्ञ
ओमेगा-3 फॅटी अॅसिड वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चिया सीड्सचे पाणी प्यावे. चिया सीड्सच्या पाण्यात असलेले घटक शरीरात थंडावा निर्माण करतात. तसेच चिया सीड्सचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, हृदयाच्या आरोग्य निरोगी राहते आणि मोठ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. चिया सीड्सचा वापर करून तुम्ही पुडिंग, दही, स्मूदी, ओट्स, सॅलड किंवा इतर कोणतीही पेय बनवू शकता.
सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक बिस्कीट किंवा इतर मसालेदार पदार्थांचे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही कडधान्य खाऊ शकता. यामध्ये विटामिन के, विटामिन सी आणि फायबर इत्यादी आवश्यक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. नियमित वाटीभर कडधान्य खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि शरीर मजबूत राहते.
डायरियामुळे शरीरात अशक्तपणा वाढला आहे? मग ‘या’ आयुर्वेदिक पेयाचे नियमित करा सेवन, जुलाब होतील बंद
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं राजमा खायला खूप जास्त आवडतो. राजमा चावला हा पदार्थ सगळ्यांच्या खूप जास्त आवडीचा आहे. राजमामध्ये 0.1 ग्रॅम ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळून येते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही राजमा खाऊ शकता.
ओमेगा-3 फॅटी ऍसिड काय आहे?
ओमेगा-3 फॅटी ऍसिड, हे आवश्यक फॅटी ऍसिड आहेत जे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. ते शरीरात तयार होत नाहीत, त्यामुळे आपण ते अन्नातून किंवा सप्लिमेंटमधून घेणे आवश्यक आहे.
ओमेगा-3 चे फायदे:
DHA, मेंदूच्या कार्यासाठी आणि cognitive कार्यासाठी महत्वाचे आहे. ओमेगा-3 डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे आणि कोरड्या डोळ्यांच्या सिंड्रोमवर उपचार करण्यास मदत करू शकते.
ओमेगा-3 ची कमतरता निर्माण झाल्यास शरीरात दिसणारी लक्षणे?
ओमेगा-3 ची कमतरता असल्यास, खालील लक्षणे दिसू शकतात: कोरडी त्वचा, थकवा, एकाग्रता कमी होणे, वारंवार आजारी पडणे, डोकेदुखी.