विमानात 13 नंबरची रो रिकामी का ठेवली जाते? होश उडवून टाकेल यामागचे कारण
तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल, तर बहुतेक वेळा तुम्ही थेट तुमच्या सीटवर जाऊन बसला असाल, हातातील सामान वरच्या कॅबिनमध्ये ठेवला असेल आणि तुमच्या आरक्षित सीटवर आरामात स्थान घेतले असेल. बहुतेक प्रवासी असंच करतात. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का, काही विमानांमध्ये 13 नंबरची रांग असतच नाही? म्हणजे सीट क्रमांक 12 नंतर थेट 14 वर जातो. हे काही चूक नसून, जगभरातील काही मान्यता आणि अंधश्रद्धांमुळे अनेक एअरलाइन्स ही पद्धत पाळतात. जसे घरं बांधताना किंवा हॉटेलमध्ये 13 नंबरचा रूम टाळण्याचा प्रघात असतो, तसंच हे विमानांतही दिसून येतं. चला, जाणून घेऊया कारण.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
एअरलाइन्स 13 नंबरची रांग का टाळतात?
13 या अंकाची भीतीला इंग्रजीत “Triskaidekaphobia” म्हणतात. ही भीती खूप जुनी आहे आणि 1911 च्या एका अमेरिकन सायकोलॉजी जर्नलमध्येही याचा उल्लेख आहे. अनेकांच्या मते 13 हा अशुभ अंक आहे आणि त्याचा संबंध धार्मिक कथा, दंतकथा आणि परंपरांशी जोडला जातो.उदा : काही जण मानतात की “लास्ट सपर” (ईसा मसीहचा शेवटचा भोजन समारंभ) यामध्ये जूडस हा 13वा पाहुणा होता, ज्याने ईसाला फसवले होते. काहींनी हा अंधविश्वास नॉर्स मायथॉलॉजीशीही जोडला आहे.
याशिवाय, अनेक संस्कृतींमध्ये 12 हा पूर्णत्वाचा प्रतीक मानला जातो (उदा.: 12 महिने, 12 राशी). त्यामुळे 13 हा अंक अपूर्ण किंवा नकारात्मक मानला जातो. प्रवाशांच्या मनातील ही भीती टाळण्यासाठी काही एअरलाइन्स 13 नंबरची रांग वगळतात, त्यामुळे सीट क्रमांक 12 नंतर थेट 14 येतो.
रांग 17 आणि इतर देशांचे अंधविश्वास
फक्त 13च नव्हे तर काही देशांत 17 हा अंकही अशुभ मानला जातो, जसे इटली आणि ब्राझीलमध्ये. यामागे कारण असे की, रोमन अंकांत 17 असे लिहिले जाते – XVII. हे उलटे केल्यास “VIXI” असे होते, ज्याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो – “मी जगलो आहे” किंवा “माझे आयुष्य संपले आहे”. लुफ्थांसा या जर्मन एअरलाइन्सनुसार, “आम्ही जगभरातील प्रवाशांच्या श्रद्धांचा आदर करतो, त्यामुळे काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 13 आणि 17 या दोन्ही रांगा नसतात.”
रो 13 टाळणाऱ्या काही प्रमुख एअरलाइन्स:
काही मात्र टाळत नाहीत