
14 नोव्हेंबरलाच का होतो बालदिन साजरा?
देशभरात सगळीकडे १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन दिवस १४ नोव्हेंबरला असतो. त्यांच्या जनदिवसानिमित्त देशभरात सगळीकडे बालदिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये कविता वाचन, गायन स्पर्धा इत्यादी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप जास्त आवडायची. लहान मुलं प्रेमाने त्यांना चाचा म्हणायचे. सर्वच लहान मुलं बालदिनाच्या आतुरतेने वाट पाहत असतात. हा दिवस लहान मुलांच्या आयुष्यात आनंद, निरागसता आणि कुतूहलाचा दिवस असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १४ १४ नोव्हेंबरला देशभरात सगळीकडे बालदिन का साजरा केला जातो? पालक मुलांसोबत बालदिन कशा पद्धतीने साजरा करू शकतात? याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी
जगभरात सगळीकडे १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ साली बालदिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये बालदिन मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण भारतात १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांसोबत खूप जास्त रमायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. त्यांना लाडक्या चाचांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो.
बालदिन आणखीनच स्पेशल करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांसोबत संपूर्ण दिवस छान वेळ घालवू शकता. दिवसभर घरातील कामे आणि मोबाईल वैगरे बाजूला ठेवून संपूर्ण वेळ तुमच्या मुलांवर लक्ष केंद्रित केल्यास मुलांनासुद्धा खूप जास्त आनंद वाटेल. तसेच मुलांसोबत तुम्ही बालपणीच्या आठवणी शेअर करून त्यांचा उत्साह वाढू शकता. खऱ्या नात्याचे हे क्षण कोणत्याही वर्तमानापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात.
लहान मुलांना भेटवस्तू खूप जास्त आवडतात. भेटवस्तू किंवा सरप्राईज पाहिल्यानंतर मुलांचा आनंद गगनात मावेनासा होऊन जातो. भेटवस्तू देताना त्यांना पुन्हा पुन्हा वापर होईल अशी भेटवस्तू द्यावी. यामुळे मुलं सुद्धा खूप जास्त आनंदी होतील. स्तक, वैयक्तिकृत डायरी किंवा हस्तनिर्मित कलाकृती पाहून मुलांना खूप जास्त आनंद होईल.
संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात घालवल्यानंतर झोपण्याआधी प्रेम व्यक्त करत चिंतन करा. यामुळे आठवणी ताज्या होतात आणि कायमच स्मरणात राहतात. मुलांमध्ये आत्मविश्वास आणि भावनिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करणे खूप जास्त गजरेचे आहे. यामुळे स्वतःबद्दल प्रेम करण्याची भावना वाढते.