Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

Benefits Of Eating On Banana Leaf : परंपरेने दक्षिण भारतात आजही अनेक समारंभ आणि लग्नसोहळ्यात जेवण हे केळ्याच्या पानावरच सर्व्ह केले जाते. यामागे पारंपारिकच नाही तर वैज्ञानिक कारण देखील जोडलेले आहे. खरंतर केळ्याच्या पानावर जेवण केल्याने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 19, 2026 | 08:15 PM
दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण भारतात आजही खास प्रसंगी जपली जाते अनोखी परंपरा.
  • या पद्धतीमागे आहेत अनेक व्यावहारिक कारणे.
  • आरोग्य आणि पर्यावरणाशीही आहे खास संबंध.
जग पुढे गेले असले तरीही काही परंपरा या आजही निरंतरपणे पाळल्या जातात. दक्षिण भारतात आजही अधिकतर घरांमध्ये, खास प्रसंगी किंवा सणसमारंभात केळ्याच्या पानांवर जेवण सर्व्ह केले जाते. यात कोणतीही शंका नाही की केळ्याच्या पानावर सर्व्ह केलेले जेवण हे दिसायला फार आकर्षित दिसते आणि एक वेगळा अनुभव देऊन जाते. विशेषतः केरळच्या ‘सद्या’मध्ये, तामिळनाडूच्या पारंपरिक जेवणात आणि दक्षिण भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये तुम्हाला केळ्याच्या पानावर सजवलेले जेवण दिसून येईल.

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? जेवण हे केळ्याच्या पानावरच का सर्व्ह केले जाते? तुम्हालाही जर वाटत असेल की केळ्याच्या पानावर जेवण सर्व्ह करणे म्हणजे फक्त दक्षिण भारताची परंपरा आहे तर आज यामागचे मूळ कारण तुम्ही जाणून घेणार आहात. केळ्याच्या पानावर जेवण सर्व्ह करणे ही जरी एक पारंपारिक पद्धत असली तरी याची सुरुवात एका वैज्ञानिक कारणामुळे झाली होती.

केळ्याच्या पानावर जेवण सर्व्ह करण्यामागचे कारण?

दक्षिण भारतात उष्ण आणि दमट वातावरणात केळ्याची झाडे सहज उगवतात. जुन्या काळात केळ्याची पाने फार सहज उपलब्ध असायची, ज्यामुळे सामूहिक भोजनावेळी त्यांचा ताटाच्या रुपात वापर केला जाऊ लागला. केळ्याचा पानांचा हा वापर स्वाभाविक आणि सुविधाजनक होता.

केळ्याच्या पानांचा वापर केल्यानंतर त्यांना फेकले जाते ज्यानंतर जनावर त्यांचे सेवन करतात यामुळे कचरा तयार होत नाही. यामुळे शेकडो लोकांना जेवण सर्व्ह करताना शेकडो भांडी घासायची गरज पडत नाही आणि केळ्यांच्या पानांचा वापर सोयीस्कर ठरतो. केळीच्या पानाचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि मेणचट असतो, ज्यामुळे त्यावर भात, सांबार, भाज्या, लोणची आणि इतर पदार्थ वाढणे सोपे जाते. गरम पदार्थ त्यावर ठेवल्यावर पानातून एक मंद नैसर्गिक सुगंधही बाहेर पडतो, ज्यामुळे जेवणाचा अनुभव अधिक आनंददायी होतो.

जेवनाचा क्रम

केळ्याच्या पानांचा वापर फक्त सुविधेच्या कारणामुळे केला जात नाही तर पारंपरिक दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत अन्न एका विशिष्ट क्रमाने वाढण्याची परंपरा देखील आहे. म्हणजेच केळ्याच्या पानावर प्रत्येक पदार्थ हा एका विशेष क्रमाने वाढला जातो. सांबार, रसम आणि शेवटी दही किंवा पायसम यांसारखे पदार्थ भातासोबत वाढले जातात. तर चटणी, पापड, वडा असे पदार्थ पानाच्या एका साईडला वाढले जातात. यामुळे केळ्याचे पान हे फक्त जेवणासाठीचे ताट बनत नाही तर भोजन व्यावस्थेचा एक भागही बनते.

चैत्रापासून फाल्गुनापर्यंत… ! मराठी महिन्यांच्या नावांमागे दडलाय हजारो वर्षांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर

आरोग्यासाठी फायदेशीर

दक्षिण भारतात जुन्या काळापासून आयुर्वेदाचे पालन केले जात आहे. अशात केळ्याच्या पानात जेवण केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळाल्याचा दावाही केला जातो. केळ्याच्या पानांमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर मान्यता आहे की, केळ्याच्या पानावर जेवण केल्याने याचा पचनालाही फायदा होतो. गरम जेवण जेव्हा केळ्याच्या पानावर सर्व्ह केले जाते तेव्हा यातील पोषक घटक आपोआप जेवणासोबत मिसळले जातात आणि आपल्या शरीराला फायदा मिळवून देतात.

 

Web Title: Why south india serves food on banana leaves tradition health environment benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • South India
  • south Indian dish

संबंधित बातम्या

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
1

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
2

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
3

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
4

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.