Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’

Chicken Soup Recipe : थंडीच्या वातावरणात आपल्या शरीराला ऊब हवी असते, ज्यासाठी चिकन सूप एक चांगला पर्याय आहे. तुम्ही घरी देखील याला तयार करू शकता. जाणून घेऊया एक सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2025 | 09:44 AM
Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम 'चिकन सूप'

Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम 'चिकन सूप'

Follow Us
Follow Us:
  • थंडीच्या वातावरणासाठी परफेक्ट रेसिपी
  • चिकन सूपची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी
  • चिकन सूप सर्दी, खोकला आणि इतर आजारांवर एक प्रभावी घरगुती उपाय ठरतो
चिकन सूप म्हणजे फक्त एक पदार्थ नाही तो अनेक घरांमध्ये आरोग्य, ऊब आणि काळजी यांचा प्रतिक आहे. थंड हवामानात शरीराला उब देण्यासाठी, सर्दी-खोकला आल्यावर घशाला आराम देण्यासाठी किंवा फक्त एखाद्या संध्याकाळी हलकं, पोट भरणारं काहीतरी हवं असेल तेव्हा चिकन सूपची आठवण हमखास येते.

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित प्या गरमागरम सूप, हाडांचे आरोग्य सुधारून कायमच राहाल ठणठणीत

आपल्या भारतीय घरांमध्ये सूपची परंपरा अगदी काही वर्षांपूर्वी आली असली तरी, हलकंसं चिकन सूप हे आपल्या रोजच्या स्वयंपाकात सहज मिसळलं आहे. त्यातल्या हलक्या मसाल्यांचा सुवास, उकळत्या पाण्यात मोकळं होत जाणारं चिकनचं रसाळ सार आणि त्यातून तयार होणारा नैसर्गिक ब्रोथ हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. अनेक डॉक्टरदेखील आजारी अवस्थेत जड अन्नापेक्षा चिकन सूपसारखं नाजूक, पचनास सोपं काहीतरी घेण्याचा सल्ला देतात.

चिकन सूपची गंमत म्हणजे ते घराघरानुसार बदलतं. कुणाच्या सूपमध्ये काळीमिरीची उष्णता असते, कुणी त्यात आले-लसूणाचा तडका देतो, तर कुणी पाश्चात्य पद्धतीने गाजर-सेलेरी टाकून स्वाद वाढवतो. पण तत्त्व एकच हे सूप शरीराला आराम देतं, मनाला शांत करतं आणि घरगुती उब देतं. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

 साहित्य

  • चिकन (हाडांसह) – 250 ग्रॅम
  • पाणी – 4 कप
  • कांदा – 1 छोटा (चिरलेला)
  • टोमॅटो – 1 (चिरलेला)
  • गाजर – 1 छोटं (चिरलेलं)
  • आले – 1 इंच तुकडा (कुटलेला)
  • लसूण – 3-4 पाकळ्या (कुटलेल्या)
  • काळी मिरी – ½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – 1 टेबलस्पून
  • तूप / तेल – 1 टीस्पून
रक्ताची कमतरता बिट भरून काढेल… घरी बनवा गुलाबी बीटाची चपाती; दिसायला आकर्षित अन् चवीला मजेदार

कृती

  • यासाठी सर्वप्रथम भांड्यात तूप किंवा तेल गरम करून त्यात कांदा, आले आणि लसूण घाला. ते सोनेरी आणि सुगंधी होईपर्यंत परतून घ्या.
  • आता त्यात टोमॅटो आणि गाजर घालून 2–3 मिनिटे परता. हे सूपला गोडवा आणि रंग देते.
  • हाडांसह चिकन घालून 3–4 मिनिटे परता. चिकन थोडं पांढरट होत जाईल.
  • हळद, काळी मिरी आणि मीठ घालून चांगलं हलवा.
  • पाणी घालून भांडे झाकून 20–25 मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या. चिकनमधला रस (स्टॉक) पाण्यात मिसळून सूपला अप्रतिम चव येईल.
  • शिजल्यावर चिकनचे तुकडे बाहेर काढून हाडं वेगळी करा आणि मांस बारीक करून पुन्हा सूपमध्ये मिसळा.
  • शेवटी कोथिंबीर घालून एक चांगली उकळी द्या. गरमागरम सूप तयार

Web Title: Winter recipe make delicious and hot chicken soup at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Soup Recipes
  • tasty food
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
1

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी
2

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’
3

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
4

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.