Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Matar Nimona Recipe : थंडीत मटारच्या किमती फार कमी होतात. ऐरवी महागड्या किमतीत मिळणारे हे मटार हिवाळ्यात स्वस्त दरात बाजारात उपलब्ध होतात अशात यापासून तुम्ही चविष्ट अशी मटार निमोनाची रेसिपी ट्राय करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 11, 2025 | 10:43 AM
Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश 'मटार निमोना'; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश 'मटार निमोना'; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Follow Us
Follow Us:
  • मटार निमोना ही उत्तर भारतातील पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी डिश आहे
  • थंडीत मटार फार स्वस्त दारात बाजारात उपलब्ध होतात
  • मटारची भाजी खायला आवडत नसल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करायला हवी
उत्तर भारतातील पारंपरिक आणि घराघरात लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे मटार निमोना. हा पदार्थ विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या आवडीने बनवला जातो. हिवाळ्यात ताजे हिरवे मटार बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, आणि त्याच ताज्या मटारांपासून तयार केलेला निमोना म्हणजे चवीला अत्यंत वेगळा, मसालेदार आणि पौष्टिक पदार्थ आहे.

Winter Recipe : थंडीच्या दिवसांत घरी बनवायला विसरू नका ‘पाया सूप’, अभिनेत्री करीना कपूरची फेव्हरेट डिश

मटार निमोना हा फक्त एक भाजी नसून एक उबदार, घरगुती आणि पारंपरिक अनुभव आहे. मटारमध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा पदार्थ शरीराला ऊर्जा देतो आणि पचनक्रियेसाठीही फायदेशीर असतो. हिवाळ्यात हा पदार्थ शरीराला उष्णता देऊन ताजेतवाने ठेवतो. यात मटार, आलं-लसूण, कांदा, मसाले आणि थोडंसं बटाटं वापरून बनवलेली ही भाजी चपाती, पराठा किंवा गरम गरम भातासोबत खाल्ली की जेवण अधिक स्वादिष्ट वाटते. मटार निमोना हे शरीराला प्रोटीन, फायबर आणि उष्णता देणारं एक परिपूर्ण जेवण आहे. चला तर मग जाणून घेऊया ही उत्तरेतील प्रसिद्ध रेसिपी आपल्या मराठी स्वयंपाकघरात कशी बनवायची.

साहित्य :

  • ताजे हिरवे मटार – १ कप (कुस्करून घेतलेले किंवा थोडेसे वाटून घेतलेले)
  • बटाटे – १ मोठा (चौरस तुकडे केलेले)
  • कांदा – २ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – २ (बारीक चिरलेले)
  • आलं-लसूण पेस्ट – २ चमचे
  • हळद – १/२ चमचा
  • लाल तिखट – १ चमचा
  • धने-जिरे पावडर – १ चमचा
  • गरम मसाला – १/२ चमचा
  • तेल – ३ चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
Winter Snacks: सकाळच्या नाश्त्यात बनवा हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट, ठिसूळ हाडांना होतील भरमसाट फायदे

कृती :

  • यासाठी सर्वात आधी ताजे मटार थोडं वाटून घ्यावं. मटार पूर्ण पेस्टसारखे न वाटता थोडे दाणेदार राहू द्यावेत, त्यामुळे भाजीला खास टेक्स्चर येतो.
  • कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याचे तुकडे घालावेत आणि ते सोनेरी रंगावर होईपर्यंत तळावेत. नंतर ते बाहेर काढून ठेवावेत.
  • त्याच तेलात कांदा परतावा. कांदा हलका तपकिरी झाला की त्यात आलं-लसूण पेस्ट घालून वास येईपर्यंत परतावे.
  • आता त्यात टोमॅटो घालून शिजवावे. टोमॅटो मऊ झाले की त्यात हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि मीठ घालून मसाला छान परतावा.
  • आता त्यात वाटलेले मटार घालावेत. मंद आचेवर ५-७ मिनिटे परतून घ्या. मटार थोडेसे तेल सोडायला लागले की
  • त्याचा रंग बदलतो आणि सुगंध येतो.
  • आता त्यात परतलेले बटाटे आणि १ कप गरम पाणी घालावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी १०-१२ मिनिटे शिजवावी.
  • भाजी शिजल्यावर गरम मसाला घालावा आणि शेवटी कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा.
  • ही भाजी गरमागरम भात, फुलका, पराठा किंवा पुरीसोबत खायला अप्रतिम लागते. त्यावर थोडं तूप टाकलं की चव आणखी खुलते.

Web Title: Winter recipe make uttar pradesh authentic and tasty matar nimona recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.