Winter Recipekareena Kapoor Favourite Dish Paya Soup Recipe In Marathi
Winter Recipe : थंडीच्या दिवसांत घरी बनवायला विसरू नका ‘पाया सूप’, अभिनेत्री करीना कपूरची फेव्हरेट डिश
Paya Soup Recipe : पाया सूप हा केवळ स्वादिष्ट पदार्थ नाही तर पारंपरिक आरोग्यदायी पेय आहे. हा सूप आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर ठरतो आणि अभिनेत्री करीना कपूर खानची ही आवडीची डिश आहे.
थंडीच्या दिवसांत शरीराला गरम ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे सूप बनवून पिले जाते
पाया सूप हा भारतीय पदार्थांमधील एक लोकप्रिय आणि पौष्टिक सूप
निवडक मसाल्यांचा वापर करून आणि मंद आचेवर शिजवून याला तयार केले जाते
थंड हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उबदार ठेवणारा आणि ताकद देणारा पदार्थ म्हणजे पायाचा सूप. हा सूप पारंपरिक भारतीय पाककलेतील एक पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेला पदार्थ आहे. विशेषतः महाराष्ट्र, हैदराबाद, आणि उत्तर भारतातील घरांमध्ये हा सूप थंडीच्या दिवसांत खास बनवला जातो. बकर्याचे पाय, मसाले, आणि मंद आचेवर शिजवलेला हा सूप शरीरातील हाडांना बळकटी, स्नायूंना पोषण आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. पायाचा सूप लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानला जातो. आज आपण घरच्या घरी हा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पाय सूप कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपीजाणून घेणार आहोत. चला तर मग लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
यासाठी सुरुवातीला पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत. हाडांवरील केस किंवा अवशेष जळून काढावे आणि स्वच्छ पाण्यात थोडं मीठ टाकून उकळून घ्यावं. यामुळे दुर्गंधी नाहीशी होते.
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा घालावा आणि तो सोनेरी रंगावर येईपर्यंत परतावा. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट घालून छान वास येईपर्यंत परतावे.
आता त्यात हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घालावा. सर्व मसाले छान एकत्र मिसळावे.
उकळलेले पाय कुकरमध्ये घालून मसाल्यासोबत ५-७ मिनिटे परतून घ्यावे. त्यामुळे मसाल्याचा स्वाद पायांमध्ये मुरतो.
आता त्यात सुमारे ४ ते ५ कप गरम पाणी घालावे आणि मीठ टाकावे. कुकरचे झाकण लावून ५-६ शिट्या येईपर्यंत शिजवावे.
कुकर थंड झाल्यावर झाकण काढून सूप पाहावे. जर सूप घट्ट वाटले तर थोडं अधिक पाणी घालून उकळावे.
तयार झालेलं पायाचं सूप बाउलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालावी. हवे असल्यास थोडा लिंबाचा रसही घालू शकता. गरमागरम सूप सर्व्ह करा.
पाय सूप हाडांना बळकट बनवण्यास मदत करते, सांध्यातील वेदना कमी करतं, तसेच शरीरातील उष्णता वाढवून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. थंडीच्या दिवसात हा सूप विशेषतः उपयुक्त आहे.
Web Title: Winter recipekareena kapoor favourite dish paya soup recipe in marathi