
जगाच्या भिन्न-भिन्न भागात खाल्ले जातात हे Famous Winter Special Food, तुम्ही ट्राय केलेत का?
मागील काही काळापासून थंडीचा ऋतू सुरु झाला आहे. हिवाळा म्हणजे गरम आणि चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची वेळ. अशा परिस्थितीत, प्रत्येक देशाची स्वतःची विशिष्ट परंपरा आणि व्यंजन आहेत, जे या थंड वातावरणात शरीराला उबदार ठेवतात. हिवाळ्यात गरमा गरम पदार्थांचा आस्वाद घेणे कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाहीत. हिवाळ्यात जगभरातील अनेक देशात काही हंगामी पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. हे पदार्थ केवळ पौष्टिकतेने समृद्ध नाहीत तर हिवाळ्याचा अनुभव आणखी खास बनवतात.
आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही हिवाळ्यातील खास पदार्थांविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत. तुम्हालाही नवनवीन गोष्टी ट्राय करायला आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडत असेल तर जगभरातील या फेमस पदार्थांची चव एकदा नक्कीच चाखून बघा. हे पदार्थ हिवाळ्याची मजा द्विगुणित करण्यास तुमची मदत करेल.
उरलेला शिळा भात फेकू नका तर त्याचा असा करा वापर, रातोरात घरातील झुरळांचा होईल नायनाट
गाजराचा हलवा (भारत)
हिवाळ्यातील हा गोड पदार्थ भारतात खूप लोकप्रिय आहे. गाजर, दूध, तूप आणि साखरेपासून बनवलेला गाजर हलवा ऊर्जा आणि उबदारपणाने परिपूर्ण असतो. हा पदार्थ सण आणि विशेष प्रसंगी, विशेषतः हिवाळ्यात मोठ्या उत्साहाने बनवला आणि खाल्ला जातो.
बोर्श (यूक्रेन)
बीटरूट, कोबी आणि मांसापासून बनवलेले हे सूप हिवाळ्यासाठी एक उत्तम आणि सोयीचा पर्याय आहे. याचा गडद लाल रंग आणि यातील मसाल्याची चव थंड हवामानात उबदारपणाची भावना देते.
चुरोस और चॉकलेट (स्पेन)
हिवाळ्यात स्पेनमध्ये चुरो आणि हॉट चॉकलेटचा आस्वाद घेतला अधिकतर घेतला जातो. गोड चॉकलेट सॉसमध्ये बुडवून तळलेले चुरो खाण्याचा अनुभव हिवाळ्यात वेगळाच अनुभव देऊन जातो. लहानांना हा पदार्थ खास करून फार आवडेल.
चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या
फोंडू (स्वित्झर्लंड)
स्वित्झर्लंडची ही डिश मेल्टेड चीजने तयार केली जाते. येथे हिवाळ्यात गरम चीजमध्ये ब्रेड बुडवून खाण्याची परंपरा खूप लोकप्रिय आहे. तुम्हीही चीज लव्हर्स असाल तर तुम्हाला या पदार्थाची चव फार आवडेल.
चिकन टॉर्टिला सूप (मेक्सिको)
मेक्सिकोमध्ये चिकन टॉर्टिला सूप खूप प्रसिद्ध आहे. हे मसालेदार सूप चिकन, टॉर्टिला चिप्स आणि मसाल्यांनी परिपूर्ण देश आहे. त्याची गरम आणि चविष्ट चव थंडीत शरीराला आराम देते आणि आतून उबदारही ठेवते.
हॉट पॉट (चीन)
चीनची ही पारंपारिक डिश हिवाळ्यात कुटुंब आणि मित्रांसोबत खाण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये भाजीपाला, मांस आणि मसाले गरम सूपमध्ये शिजवून गरमा गरम याचा आस्वाद घेतला जातो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.