उरलेला शिळा भात फेकू नका तर असा करा याचा वापर, रातोरात घरातील झुरळांचा होईल नायनाट
घरात झुरळांची समस्या सामान्य आहे मात्र अनेकदा ही समस्या आपल्याया हैराण करून सोडत असते. एकदा का ही झुरळं घरात घुसली की मग एकामागून एक ती वाढतच जातात. यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला ती दिसू लागतात. अनेकदा स्वयंपाकघरात यांचा अधिक वावर दिसून येतो जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. घरातील अन्न पदार्थांवर त्यांचा वावर होऊ लागतो आणि एकंदरीतच आपले घर अस्वछ होऊ लागते. बऱ्याचदा या झुरळांचा उच्छाद इतका वाढतो की आपल्यालाच आपले घर नकोसे वाटू लागते.
बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्याने झुरळं घरातून पळून तर जातात मात्र यातील रासायनिक घटकांमुळे यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. अशावेळी नैसर्गिक उपाय हे अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरू शकतात. आज आमही तुम्हाला झुरळ घालवण्यासाठी असा एक उपाय सांगणार आहोत ज्याने घरातील झुरळं तर पळतीलच, शिवाय यात तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत. अगदी सोप्या घरगुती उपायाने तुम्ही घरातील झुरळांचा नायनाट करू शकता. काय आहे तो उपाय? चला जाणून घेउयात.
चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या
भातापासून तयार करा नैसर्गिक औषध
तुम्हाला माहिती नसेल मात्र रात्रीच्या उरलेल्या भाताचा वापर तुम्ही घरातील झुरळं घालवण्यासाठी करू शकता. भातात थोडीशी ब्राऊन साखर व डिटर्जंट पावडर किंवा फिनाईल मिसळून हा भात चांगला मिक्स करा. आता या भाताच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करा आणि घरात ज्या ठिकाणी झुरळांचा वावर फार आहे तिथे हे गोळे नेऊन ठेवा. भात आणि ब्राऊन साखर यांच्या मिश्रणामुळे झुरळे आकर्षित होतात मात्र यात मिसळण्यात आलेले डिटर्जंट पावडरमधील घटक विषाचे काम करतात जे त्यांना क्षणात मारून टाकतात. हा उपाय विशेषतर रात्री करावा कारण रात्रीच्या वेळी झुरळांचा वावर घरात अधिक दिसून येतो.
50 वर्षात एकदाही आजारी पडले नाहीत, आजही केस काळे; या 3 भाज्या खाऊन रामदेव बाबा ठेवतात शेकडो आजारांना दूर
बोरिक पावडरचाही करू शकता वापर
उरलेल्या भातात बोरिक पावडर किंवा अॅसिड मिसळून झुरळांच्या समस्येपासून दूर होण्यासाठी एक प्रभावी मिश्रण तयार करता येते. यासाठी उरलेल्या भातात काही चमचे बोरिक पावडर मिसळा आणि हे मिश्रण झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवा. बोरिकमुळे झुरळांना पचनाचा त्रास होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. हा उपाय सहजरित्या घरच्या घरी करता येतो. शिवाय याचा परिणाम लगेच दिसून येतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.