Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health: मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ही गंभीर लक्षणे,

Women Health: मासिक पाळी आल्यानंतर योनीमार्गाचा pH बदलण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पॅडवर किंवा मेंस्ट्रुअल अंडरवेअरमध्ये साचून राहिलेले रक्त हवेच्या संपर्कात आल्यावर वास विकसित होतो. याशिवाय बॅक्टेरियल व्हॅजिनायसिससारखे इन्फेक्शन वाढल्यामुळे सुद्धा मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास येण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2026 | 05:30 AM
मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ही गंभीर लक्षणे

मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ही गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीच्या रक्ताला वास का येतो?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या?
इन्फेक्शन वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

Women Health: वयाच्या १२ ते १३ वर्षानंतर मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. मासिक पाळी येणे हे चक्र महिलांच्या शरीरात वर्षानुवर्षे चालू असते. त्यामुळे प्रत्येक महिन्यात महिलांना ४ ते ५ दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर स्त्रियांचे गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार होते. अंडाशयातून एक स्त्रीबीज बाहेर पडते आणि गर्भाशयाचा स्तर जाड होतो. त्यांनतर गर्भाशयात तयार झालेला जाड स्तर रक्ताच्या आणि ऊतींच्या रूपाने योनीमार्गाद्वारे बाहेर पडतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मासिक पाळीचे चक्र साधारणता २८ ते ३० दिवसांचे असते. पण बऱ्याचदा मासिक पाळी आल्यानंतर रक्ताला हलका किंवा किंचित धातूसारखा वास येतो. पण काहीवेळा अचानक वाढलेली जळजळ किंवा माशांसारखा वास येत असेल तर सामान्य समस्या नसून वाढत्या इन्फेक्शनचा धोका असू शकतो.(फोटो सौजन्य – istock)

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य

नाजूक अवयवांमध्ये वाढलेली जळजळ, अचानक येणारी खाज, वेदना, पॅड वेळेवर न बदलणे, घाम, ओलावा आणि घट्ट कपड्यांमुळे सुद्धा वास येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पाळी दरम्यान दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. मासिक पाळी आल्यानंतर कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, ओटीपोटात दुखणे इत्यादी समस्या प्रत्येक महिन्याला उद्भवतात. चला तर जाणून घेऊया मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो आणि इन्फेक्शन वाढल्यास कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती.

मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो?

मासिक पाळी आल्यानंतर शरीरात हार्मोनल चढ उतार होतात. याच बदलांचा परिणाम काहीवेळा शरीरावर लगेच दिसून येतो. योनीमार्गात नैसर्गिकरीत्या निरोगी जिवाणू असतात जे नाजूक अवयवांमधील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत करतात. पण मासिक पाळी आल्यानंतर योनीमार्गाचा pH बदलण्याची जास्त शक्यता असते. पॅडवर किंवा मेंस्ट्रुअल अंडरवेअरमध्ये साचून राहिलेले रक्त हवेच्या संपर्कात आल्यावर वास विकसित करतो. पॅड खूप उशिरापर्यंत न बदलणे, जास्त रक्तस्त्राव, घामाची आर्द्रता, घट्ट आणि हवेशीर नसलेले कपडे वापरणे किंवा बॅक्टेरियल व्हॅजिनायसिससारखे इन्फेक्शन वाढल्यामुळे मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास येण्याची जास्त शक्यता असते.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यावी?

मासिक पाळी आल्यानंतर नाजूक अवयवांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. सॅनिटरी पॅड दर ४ ते ६ तासांनी किंवा खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास तातडीने बदलणे आवश्यक आहे. टॅम्पोन ४ ते ६ तासांनी बदलावे. मेंस्ट्रुअल कप, पॅड, टॅम्पोन इत्यादी बदलल्यानंतर हात स्वच्छ धुवणे फार आवश्यक आहे, अन्यथा इन्फेक्शन वाढण्याचा खूप जास्त धोका असतो.

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

सुवासिक उत्पादनांचा वापर करणे टाळावे:

परफ्यूमयुक्त इंटिमेट वॉश, डिओड्रंट स्प्रे, सुवासिक पॅड आणि व्हॅजिनाल डच वापरणे टाळावे. या उत्पादनांच्या वापरामुळे संवेदनशील त्वचेची जळजळ किंवा योनीमार्गातील नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. याशिवाय अनेक महिला नाजूक अवयवांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशनचा वापर करतात. पण या उत्पादनांच्या वापरामुळे योनीमार्गात जळजळ किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळीच्या रक्ताला थोडा वेगळा वास येणे सामान्य आहे का?

    Ans: होय. मासिक पाळीतील रक्त आणि योनीतील नैसर्गिक द्रव यांमुळे सौम्य वेगळा वास जाणवू शकतो. मात्र अचानक खूप तीव्र किंवा दुर्गंधीयुक्त वास जाणवत असल्यास त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • Que: संसर्ग झाल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: दुर्गंधीयुक्त किंवा वेगळ्या रंगाचा स्त्राव, खाज, जळजळ, लघवी करताना त्रास, संभोगावेळी वेदना, ओटीपोटात दुखणे किंवा मासिक पाळीच्या दरम्यान अनियमित रक्तस्राव अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: वासासोबत ओटीपोटात तीव्र दुखत असेल तर काय करावे?

    Ans: तीव्र ओटीपोटदुखी, ताप, दुर्गंधीयुक्त स्त्राव, लघवी करताना जळजळ किंवा अनियमित रक्तस्राव असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ही लक्षणे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजसारख्या संसर्गाशी संबंधित असू शकतात.

Web Title: Women health bad smell during periods know why it happens and the warning signs of infection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • menstruation health
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

Pregnancy Tips: डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास
1

Pregnancy Tips: डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.