Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Cancer Awareness Month: प्रदूषण आणि सेकंडहँड स्मोकमुळे महिलांमध्ये वाढतेय फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण

सध्या महिलांमध्ये विविध कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे अनेक अभ्यासातून समोर येत आहे. यातही स्मोकिंग आणि प्रदूषणामुळे अधिक प्रमाण होतेय. जागतिक कर्करोग जागरूकता महिन्याच्या निमित्ताने जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 06, 2025 | 06:05 PM
फुफ्फुसांचा कर्करोग महिलांमध्ये वाढण्याचे प्रमाण अधिक (फोटो सौजन्य - iStock)

फुफ्फुसांचा कर्करोग महिलांमध्ये वाढण्याचे प्रमाण अधिक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक कर्करोग जाकरुकता महिना
  • फुफ्फुसाचा कर्करोग महिलांमध्ये वाढतोय 
  • काय आहेत कारणं 

फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जागरूकता महिन्यात एक चिंताजनक बाब समोर येत आहे. अनेक महिला धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पर्यावरणातील घटक, जीवनशैली आणि सुरुवातीची लक्षणे ओळखणे या गोष्टी प्रतिबंध आणि वेळेवर उपचारासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फुफ्फुसांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी या आजारापासून स्वतःचा बचाव कसा करावा हे जाणून घ्या.

भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. फुफ्फुसातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्याने त्याजागी ट्यूमर तयार होतो. जे श्वसनात अडथळा निर्माण करतात आणि शरीराच्या इतर भागांपर्यंत पसरू शकतात. धूम्रपान हे या आजाराचे मुख्य कारण असले तरी अनेक धूम्रपान न करणाऱ्या महिलांनाही हा आजार होत आहे. डॉ. तन्वी भट्ट, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी  हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

5 सेकंदात Lungs Cancer ची पटणार ओळख, घरीच करा तपासणी; हाताची बोटं सांगतील लक्षणं

काय आहे कारण

यामागील कारणांमध्ये दीर्घकाळ प्रदूषित हवेचा संपर्क येतो. ज्यामुळे फुफ्फुसातील ऊतकांचे नुकसान होते. घरातील प्रदूषणही फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरते. बंद स्वयंपाकघरात होणारा धूर किंवा बायोमास इंधनाचा वापर यामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग वाढू शकतो. दुसऱ्यांच्या धूम्रपानाच्या धुराचा (सेकंडहँड स्मोकचा) दीर्घ संपर्क फुफ्फुसातील पेशींमध्ये सूज आणि डीएनए चे नुकसान करतो. आनुवंशिक घटकही धूम्रपान न करणाऱ्या महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढवतात.

अंदाजे ३०% धूम्रपान न करणाऱ्या महिलांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सतत खोकला येणे, श्वास घेताना त्रास होणे, छातीत वेदना किंवा जडपणा, थकवा जाणवणे आणि अचानक वजन कमी होणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचाराचा परिणाम चांगला मिळू शकतो. त्यामुळे जर सतत श्वसनासंबंधी त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.

कोणत्या थेरपी कराव्यात 

या आजाराचा उपचार हा कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असतो. यात ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचा समावेश असतो. उपचाराची पद्धत डॉक्टर ठरवतात. त्यानुसार डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास रूग्ण कर्करोगातून लवकर बरा होऊ शकतो. 

या व्यतिरिक्त धूम्रपान न करणाऱ्या महिलांमध्येही पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग वाढतो आहे. याबद्दल जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. जसे की धूर आणि प्रदूषणापासून बचाव करणे. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची काळजी घ्या. जागरूक राहा आणि फुफ्फुसांचे रक्षण करा.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे Lung Cancer चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणे

Web Title: World cancer awareness month lung cancer rates are increasing among women due to pollution and secondhand smoke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Cancer Awareness
  • lung cancer
  • Lung health

संबंधित बातम्या

ॲनिमियावाढीची चिंताजनक नोंद! राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ
1

ॲनिमियावाढीची चिंताजनक नोंद! राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ

हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला
2

हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला

दिवाळीनंतरच्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तज्ज्ञांनी दिला सोपा उपाय
3

दिवाळीनंतरच्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तज्ज्ञांनी दिला सोपा उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.