फोटो सौजन्य - Social Media
पूर्वी फुफ्फुसाचा कर्करोग हा मुख्यतः वृद्ध आणि धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आढळतो असे समजले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले असून, हा आजार आता तरुण वयातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, आता नॉन-स्मोकर म्हणजेच धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढताना दिसतो आहे.
तरुणांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग का वाढतो?
जनुकीय बदल (Genetic Mutation)
EGFR, ALK, ROS1 यांसारख्या जीनमध्ये बदल आढळल्यास कर्करोग होण्याची शक्यता वाढते. हे बदल धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही आढळू शकतात.
प्रदूषण आणि वातावरणीय घटक
तरुणांमध्ये लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बऱ्याचदा हा आजार उशिरा म्हणजेच अॅडव्हान्स स्टेजमध्ये सापडतो. परंतु ज्या रुग्णांमध्ये जनुकीय म्युटेशन असते त्यांना टार्गेटेड थेरपी किंवा इम्यूनोथेरेपीद्वारे अधिक प्रभावी उपचार मिळू शकतो.
बचावासाठी महत्त्वाच्या गोष्टी






