फुफ्फुसाचा कर्करोग कसा होतो ओळखा लक्षणं
फुफ्फुसाचा कर्करोग हा जगातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. 2020 मध्ये, फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरात 2,206,771 नवीन केसेससह दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असल्याचा अहवाल द लॅन्सेटने दिला आहे. इतकेच नाही तर कॅन्सरशी संबंधित मृत्यूचे 1,796,144 मृत्यू हे प्रमुख कारण असल्याचेही सांगितले आहे.
या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे निदानास उशीर, त्यामुळे वेळेवर उपचार सुरू होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला धोका आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डायमंड फिंगर टेस्ट करू शकता. ही चाचणी फक्त सोपी नाही तर ती घरीही सहज करता येते असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे डायमंड फिंगर टेस्ट
डायमंड फिंगर टेस्ट कशी करावी
या चाचणीमध्ये अंगठा आणि तर्जनी एकत्र आणण्याची गरज आहे. जर त्यांच्यामध्ये जागा तयार होत नसेल, तर ते बोटांच्या क्लबिंगचे लक्षण आहे, जे फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता दर्शवते. कॅन्सर रिसर्च युकेच्या मते, ही स्थिती लहान पेशी नसलेल्या फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या 35% पेक्षा जास्त लोकांमध्ये दिसून येते. क्लबिंग, फुफ्फुस, हृदय किंवा पचनसंस्थेतील समस्या हा त्याचा संकेत असू शकतात.
हेदेखील वाचा – 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी
कोणती लक्षणे आहेत?
कोणती लक्षणे तुम्हाला जाणवतात
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ व्यक्तीला खोकला राहतो आणि अजिबात जात नाही. तसंच छातीत जंतुसंसर्ग, खोकल्यातून रक्त येणे, श्वास लागणे आणि भूक न लागणे अशा लक्षणांचा समावेश होतो. याशिवाय चेहऱ्यावर आणि मानेवर सूज येणे, घरघर होणे आणि गिळण्यास त्रास होणे हीदेखील त्याची लक्षणे असू शकतात.
काय आहे कारण आणि जोखीम
फुफ्फुसाच्या कर्करोगाची मुख्य कारणे म्हणजे धूम्रपान, प्रदूषण, एस्बेस्टोस आणि रेडॉनचा संपर्क ही आहेत. तसंच कौटुंबिक इतिहास, एचआयव्ही हेदेखील या आजारासाठी धोक्याचे घटक आहेत. त्यामुळे धुम्रपानापासून तर तुम्ही दूर राहणेच अधिक फायदेशीर आहे. मात्र सध्या प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले असून याचा जास्त परिणाम होताना दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी
कसे वाचाल
काय करणे टाळावे
फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपान सोडणे किंवा टाळणे फार महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त संत्री, टेंगेरिन्स, पीच आणि गाजर यांसारखे पदार्थ फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता कमी करू शकतात त्यामुळे या पदार्थांचा आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश करून घ्यावा. तसेच, प्रदूषणाच्या काळात फेस मास्क घालणे देखील फायदेशीर ठरू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.