फुफ्फुसाच्या कर्करोगाचे परिणाम
फुफ्फुसांचा कर्करोग अर्थात लंग कॅन्सर हा स्त्री-पुरुषांवर सारख्याच प्रमाणात परिणाम करणारा व सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा कर्करोग आहे. विज्ञानाने इतकी प्रगती साधूनही त्याला चकवा देऊन या आजाराची होणारी वाढ आणि आरोग्य प्राप्त करण्याच्या क्षमतेमध्ये जगभरात दिसून येणारी असमानता व वर्तणूक यांच्यामुळे बहुसंख्य रुग्णांच्या बाबतीत निदानाला विलंब होतो. याचा अर्थ भारतातील 40% रुग्णांच्या आजाराचे निदान तो इतर भागांमध्ये (आजार प्रगत टप्प्यावर पोहोचल्याचे चिन्ह) पसरल्यावर होते. डॉ. मिहीर गंगाखेडकर, कन्सल्टंन्ट पल्मोनोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
लंग कॅन्सरवरील सखोल अभ्यास
फुफ्फुसांच्या कर्करोगाचे मॉलेक्युलर मार्कर्स आणि जेनेटिक चाचण्या या संदर्भात उपचारांचा चेहरामोहरा संपूर्ण बदलणारे ठरत आहेत. रुग्णाच्या शरीरातील उतींच्या नमुन्यात किंवा अगदी उतींमध्येही आढळून येणाऱ्या काही विशिष्ट खुणा किंवा मार्कर्स कर्करोगाची अनेकपट वाढ होण्यासाठी आणि तो पसरण्यासाठी नेमके कोणते कारण चालना देत आहे हे सांगू शकतात.
त्यानंतर विशिष्टरित्या डिझाइन करण्यात आलेल्या मॉलेक्युल्सचा वापर करून त्या खुणांना लक्ष्य केले जाऊ शकते व त्यायोगे आजाराची वाढ आणि त्याचे पसरणे दोन्हीही आटोक्यात आणले जाऊ शकते. या ‘लक्ष्य करता येण्यायोग्या (टार्गेटेबल) म्युटेशन्स’चा सखोल अभ्यास करण्यात आला आहे आणि दरवर्षी नवनवीन म्युटेशन्स तपासली जाणार आहेत.
जीवनशैलीविषयक सवयींमुळे वाढतो स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका, काय सांगतात तज्ज्ञ
फुफ्फुसाचा कर्करोग बरा होतो का
सुरुवातीच्या टप्प्यावरील कर्करोग शस्त्रक्रियेने रोगग्रस्त पेशी काढून टाकून बरा करता येतो, मात्र पुढच्या टप्प्यांवर मात्र केमोथेरपी आणि रेडिओथेरपी यांचा एकत्र वापर गरजेचा ठरू शकतो (आणि खरे म्हणजे त्यात शस्त्रक्रियेचा पर्याय उरलेला नसू शकतो) केमोथेरपी हे उपचारांचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन असते हे खरे आहे, मात्र त्यात विषारी घटकांची मात्रा लक्षणीय असू शकते, इतकी की काही रुग्णांच्या बाबतीत त्याच्या फायद्यांपेक्षा धोकाच अधिक असल्याचे आढळून आल्याने ते या उपचारांसाठी अपात्र मानले जातात.
अशाप्रकारे निश्चित करण्यात आलेली ‘टार्गेटेड थेरपी’ बरेचदा पारंपरिक केमोथेरपीहून अधिक सहजपणे मानवते, ती नसेवाटे घेण्याऐवजी तोंडावाटे घेण्याच्या औषधांच्या रूपात असू शकते आणि तिच्या परिणामकारकतेमुळे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये उपचारांचा पहिला पर्याय म्हणूनही तिचा विचार होऊ शकतो. विशिष्ट लक्ष्य असल्याने हा रेणू अर्थात मॉलेक्युल उर्वरित शरीराचे ‘बाय-स्टॅडर्ड डॅमेज’ पद्धतीचे नुकसान करण्याची शक्यता कमी असते, ज्यामुळे हे उपचार जास्त चांगल्या प्रकारे सहन करता येतात.
काय आहेत थेरपी
एखादे औषध अपयशी ठरण्याची शक्यता समजून घेता येणे व तुमच्या उपचारांची त्यानुसार आखणी करण्यास मदत करणे हीसुद्धा मॉलेक्युलर प्रोफाइलिंगची आणखी एक बाजू आहे. काही मार्कर्समुळे आजार स्वत:च अधिक आक्रमक आहे का आणि खुद्द ‘टार्गेटेड थेरपी’लाही तो प्रतिसाद देण्याची कितपत शक्यता आहे याचा अंदाज वर्तवण्यासही मदत होते. ‘इम्युनोथेरपी’ ही उपचारांची आणखी एक शाखा आहे, जिने आजाराचा उद्भव नेमका कशातून झाला आहे हे समजून घेण्यासाठी मॉलेक्युलर मार्कर्सचा वापर करून रुग्णांसाठी ऑन्कोथेरपीमध्ये क्रांती घडवून आणली आहे.
या मॉलेक्युल्सची उत्तम सुसह्यता आणि आजार नियंत्रणात ठेवण्याची प्रयोगसिद्ध क्षमता यांच्यामुळे त्याचा वापर काही प्रारंभिक टप्प्यावर असलेल्या कर्करोगांसाठी अधिकाधिक प्रमाणात केला जाऊ लागला आहे.
Cancer Awareness Month: केवळ पुरूषांनाच लक्ष्य करतात ‘हे’ कॅन्सर, 7 लक्षणे दिसताच डॉक्टरांना गाठाच
महागड्या औषधांवर अनुदान
सरकारची मदत अधिक प्रमाणात मिळू लागल्याने महागड्या औषधांवर अनुदाने मिळतात, मात्र भारताची लोकसंख्या अजूनही खूप जास्त आहे व त्यामुळे या औषधांसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करणे परवडण्यासारखे नाही. तरीही, ‘प्रोग्रेशन फ्री सर्व्हायव्हल’ अर्थात आजार फैलावण्यापासून मुक्त असे जीवनदान मिळविण्याची संधी वर्षागणिक अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे.
जेनेटिक प्रोफाइलिंग बरेचदा तुम्हाला उपचारांची सुस्पष्ट दिशा दाखवते आणि काही वेळा तर कोणत्याही प्रकारची केमोथेरपी सोसणार नाही इतके आजारी असलेल्या रुग्णांसाठी तीच एकमेव दिशा असते. म्हणूनच रुग्णांनी आपल्याला उपचारांचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी जागरुक असायला हवे आणि जिथे थेरपी घेण्याचे ठरविले आहे त्या संस्थेमध्ये ‘नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंग (NGS)’, ‘म्युटेशन अनॅलिसिस’ आणि ‘इम्युनोथेरपी’ उपलब्ध आहे का हे आवर्जून विचारले पाहिजे. कुणास ठाऊक तुमच्यासाठीच्या उपचारांची तीच आधारशीला ठरू शकेल.