Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Contraception Day: गर्भनिरोधक गोळ्यांमुळे जाऊ शकतो जीव, 5 गंभीर दुष्परिणाम

World Contraception Day 2024: गर्भनिरोधक गोळ्यांना बर्थ कंट्रोल पिल्स असेही म्हटलं जातं. गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी एक प्रभावी आणि व्यावहारिक मार्ग आहे असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ही गोळी खाण्याचा सल्ला देतात. मात्र, प्रत्येक औषधाप्रमाणे या गोळ्यांचेही काही दुष्परिणाम आहेत, जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 26, 2024 | 11:26 AM
गर्भनिरोधक गोळ्यांचे होणारे दुष्परिणाम

गर्भनिरोधक गोळ्यांचे होणारे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

अनेकदा नको असलेली गर्भधारणा टाळायची असेल तर महिलांना गर्भनिरोधक गोळी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र ही गोळी सतत घेणे धोकादायक ठरू शकते. अन्य औषधांप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्यांचेही शरीरावर दुष्परिमाण होतात. प्रत्येक औषधाप्रमाणे, या गोळ्यांचे देखील काही संभाव्य तोटे आणि साइड इफेक्ट्स आहेत, ज्याबद्दल प्रत्येक स्त्रीने जागरूक असले पाहिजे. तज्ज्ञांकडून याबद्दल अधिक माहिती घेऊया.

अनेक अभ्यासामध्ये याबाबत सांगण्यात आले आहे. आज वर्ल्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह डे असून याबाबत प्रत्येक महिलेने जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच या विषयावर अधिकाधिक चर्चा होणेही गरजेचे आहे (फोटो सौजन्य – iStock) 

काय सांगतात तज्ज्ञ

गर्भनिरोधक गोळ्यांबाबत काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे

‘प्रिस्टाइन केअर’च्या सह-संस्थापक आणि ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. गरिमा साहनी यांनी सांगितले की, या गोळ्या हार्मोन्सवर आधारित आहेत, ज्यामध्ये एकतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन किंवा फक्त प्रोजेस्टिन असतात. हे अंडाशयातून (ओव्हुलेशन) अंडी सोडण्यास प्रतिबंध करतात आणि गर्भाशयाच्या मुखाभोवती श्लेष्मा घट्ट करतात, ज्यामुळे शुक्राणूंना गर्भाशयापर्यंत पोहोचणे कठीण होते. जर या गोळ्या योग्य पद्धतीने घेतल्या तर त्या 99 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरतात.

हेदेखील वाचा – कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या नसताना गर्भधारणेपासून स्वत:ला कशा वाचवायच्या त्या स्त्रिया ? सुल्तान सुलेमानच्या राज्यात चालायचं तरी काय ?

काय आहेत दुष्परिणाम

कोणते त्रास होऊ शकतात

या गोळ्या बहुतेक महिलांसाठी सुरक्षित असल्या तरी काही महिलांना गंभीर दुष्परिणाम जाणवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, काही प्रमुख आणि धोकादायक दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

  • रक्ताच्या गुठळ्या: गर्भनिरोधक गोळ्या रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढवू शकतात, विशेषत: धूम्रपान करणाऱ्या किंवा 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये हा त्रास होतो
  • हृदयरोग: या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो
  • यकृताच्या समस्या: गर्भनिरोधक गोळ्यांमुळे काही स्त्रियांमध्ये यकृताच्या गाठी होऊ शकतात
  • स्तनाच्या कर्करोगाचा धोका: काही संशोधनांनी असे सुचवले आहे की गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो
  • मूड बदलणे आणि नैराश्य: हार्मोनल बदलांमुळे, काही स्त्रियांना मूड स्विंग, चिंता किंवा नैराश्याचा सामना करावा लागतो
कोणत्या महिलांनी काळजी घ्यावी?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या, ज्या महिला धूम्रपान करतात किंवा ज्यांना उच्च रक्तदाब, थ्रोम्बोसिस किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांनी या गोळ्या वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या मनाप्रमाणे कोणत्याही महिलेने या गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करू नये. असे करणे जीवावर बेतू शकते हे वेळीच लक्षात घ्या. 

हेदेखील वाचा – गर्भनिरोधक गोळ्यांमुळे प्रजनन क्षमता कमी होते? त्यांचा शरीरावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या

पर्याय काय आहेत?

गर्भनिरोधक गोळ्या तुमच्यासाठी योग्य नसल्यास, पर्यायांमध्ये अंतर्गर्भीय उपकरणे (IUD), कंडोम, गर्भनिरोधक पॅच आणि रोपण यांचा समावेश होतो. या गोष्टींचा वापर करून तुम्ही नको असलेले गर्भारपण थांबवू शकता. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: World contraception day 2024 5 side effects of having contraceptive pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

WHO: जग शाश्वत विकासाच्या वाटेवर, तरी मूलभूत गरजांची पूर्तता मात्र अपुरी
1

WHO: जग शाश्वत विकासाच्या वाटेवर, तरी मूलभूत गरजांची पूर्तता मात्र अपुरी

Air Pollution : आता श्वास घेणंही धोकादायक?  ‘प्रदूषित हवा ठरतेय सायलेंट किलर’ ; WHO गंभीर इशारा
2

Air Pollution : आता श्वास घेणंही धोकादायक? ‘प्रदूषित हवा ठरतेय सायलेंट किलर’ ; WHO गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.