Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cancer: कॅन्सरच्या महागड्या तपासणीचा खर्च वाचणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Cancer: कर्करोग उपचारांशी संबंधित 63 उपचार पॅकेजमध्ये PET-CT स्कॅनचा अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add-on Diagnostic Procedure) म्हणून समावेश करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 04:29 PM
महागड्या तपासणीचा कॅन्सर रुग्णावरील आर्थिक भार कमी होणार

महागड्या तपासणीचा कॅन्सर रुग्णावरील आर्थिक भार कमी होणार

Follow Us
Follow Us:
  • महागड्या तपासणीचा कॅन्सर रुग्णावरील आर्थिक भार कमी होणार
  • ६३ उपचारांचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून योजनेत समावेश
  • 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांना ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून मान्यता
मुंबई/Cancer: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली PET-CT स्कॅन ही महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तसेच निवडक 13 प्रकारच्या कर्करोगांसाठी पीईटी-सीटीचा स्वतंत्र अथवा नियमित प्राथमिक निदान प्रक्रिया म्हणून समावेश केला आहे. या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना स्वतःच्या खिशातून महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा भार कमी होणार आहॆ.

सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, शासन निर्णयानुसार, 63 कर्करोग उपचारांचा पॅकेजमध्ये PET-CT तपासणीचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून समावेश केला आहॆ. तसेच 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून या तपासणीला मान्यता देण्यात आली आहे.

Cancer Risk : नाईट शिफ्टमधील काम आणि कर्करोगाचा धोका: वैद्यकीय संशोधन काय सांगते, निष्कर्ष काय ?

महागड्या तपासणी खर्चामुळे अनेकदा रुग्ण PET-CT तपासणी पुढे ढकलत किंवा तपासणी टाळत असत. परिणामी आजाराचे स्वरूप समजण्यास आणि योग्यवेळी उपचारांचे नियोजन करण्यास विलंब होतो. ही अडचण लक्षात घेऊन PET-CT तपासणीचा योजनेत समावेश करण्याची मागणी नागरिक व सलंग्न रुग्णालयांकडून होत होती. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ,योग्य वेळी होतील. तसेच रुग्णांना महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्करोग उपचारांशी संबंधित 63 उपचार पॅकेजमध्ये PET-CT स्कॅनचा अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add-on Diagnostic Procedure) म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 44 उपचार पॅकेजमध्ये ही सुविधा समाविष्ट होती. नव्या निर्णयामुळे अशा अतिरिक्त पॅकेजची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या निदान प्रक्रियेची उपलब्धता अधिक व्यापक होण्यास मदत होईल. याशिवाय, वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्तता निश्चित झालेल्या निवडक 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी PET-CT स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया (Regular/Primary Procedure) म्हणून समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. PET-CT तपासणीसाठी संपूर्ण शरीर (Whole Body) ₹२०,४००, मेंदू (Brain) ₹१४,६५०, गॅलियम-६८ (Gallium 68) ₹१५,०००, हृदय (Cardiac) ₹९,४०० हा दर निर्धारित केलेले असून रुग्णालयांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार आहे.

PET-CT तपासणीसाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीची वैद्यकीय आवश्यकता प्रमाणित करणे बंधनकारक आहे. तसेच, संबंधित अंगीकृत रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे, पात्र मनुष्यबळ आणि स्वतःचे PET-CT केंद्र (In-house PET-CT Centre) असणे आवश्यक आहे. तपासणीपूर्वी पूर्वमान्यता घेणे आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक राहणार आहे. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या TMS 2.0 प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना PET-CT सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना अचूक व योग्य टप्प्यावर निदान होण्याबरोबरच उपचारांचे योग्यवेळी नियोजन होण्यास मदत होईल. या तपासणीचा विस्तारीत महात्मा फुले व जन आरोग्य योजनेत समावेश करने हा राज्य शासनाच्या कॅन्सर विरोधी लढ्यातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहॆ.

Web Title: Maharashtra government decision pet scan test in under government scheme health news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • cancer
  • Health News
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
1

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय
2

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

Cancer Risk : नाईट शिफ्टमधील काम आणि कर्करोगाचा धोका: वैद्यकीय संशोधन काय सांगते, निष्कर्ष काय ?
3

Cancer Risk : नाईट शिफ्टमधील काम आणि कर्करोगाचा धोका: वैद्यकीय संशोधन काय सांगते, निष्कर्ष काय ?

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार
4

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.