
World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण 'स्टेमी क्रिटिकल'
World Heart Day: हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा प्रत्येक क्षण रुग्णासाठी निर्णायक असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यास हृदयाच्या स्नायूंचे नुकसान वाढत जाते. अशा ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाला तातडीने निदान आणि उपचार मिळावेत, यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेला ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्प अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचे आजच्या २९ सप्टेंबर या जागतिक हृदयदिनी स्पष्ट होत आहे. गावपातळीवरील आरोग्यसंस्थेपासून थेट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीच्या सुविधेपर्यंत उपचारांची साखळी या प्रकल्पातून उभी करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली.(फोटो सौजन्य – istock)
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, प्रकल्पांतर्गत २०२०-२१ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ५७लाख ९० हजार ९६३ ईसीजी करण्यात आले. यापैकी ३४ हजार ३२ रुग्ण स्टेमी क्रिटिकल, तर १ लाख ४५ हजार ५०३ रुग्ण इतर क्रिटिकल आढळले. म्हणजेच केलेल्या प्रत्येक १०० ईसीजींपैकी सुमारे ३ रुग्ण क्रिटिकल श्रेणीत आढळले असून, त्यातील सुमारे ०.५९ टक्के रुग्ण स्टेमी क्रिटिकल आढळले.
स्टेमी म्हणजे ‘एसटी-इलेव्हेशन मयोकार्डियल इन्फावर्शन’. हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी होऊन रक्तपुरवठा अचानक बंद झाल्यास हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. त्यामुळे ईसीजीद्वारे स्टेमीचे निदान शक्य तितक्या लवकर होणे आणि त्यानंतर बंद रक्तवाहिनी खुली करण्यासाठी अँजिओप्लास्टीसारखा उपचार वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याच उपचार साखळीला बळ देण्याचे काम स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पातून केले जात आहे.
राज्यातील २,४१५ ‘स्पोक’ आरोग्यसंस्था आणि ९६ ‘हब’ यांच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राथमिक आरोग्यसंस्थेत ईसीजी करून त्याचे तातडीने मूल्यांकन केले जाते. रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’ असल्याचे निदान झाल्यास पुढील उपचारांसाठी त्याला हब रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे निदानापासून रक्तवाहिनी खुली करण्याच्या उपचारापर्यंतचा मौल्यवान वेळ वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
८८ स्टेमी प्रकल्प अत्यंत उपयुक्त असून, हृदयविकाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. प्रकल्पातील उपलब्ध मनुष्यबळाचे मॅपिंग करण्यात येत असून, उपलब्ध स्टाफच्या क्षमतेनुसार त्याचा योग्य वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संजय काटकर यांनी दिली आहे.
Ans: STEMI म्हणजे ST-Elevation Myocardial Infarction, हा हृदयविकाराचा एक गंभीर प्रकार आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूला नुकसान होऊ शकते.
Ans: हृदयविकाराच्या गंभीर स्थितीत उपचार सुरू होण्यास जितका विलंब होईल तितके हृदयाच्या स्नायूचे नुकसान वाढू शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
Ans: छातीत दडपण किंवा वेदना, हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे पसरणारी वेदना, धाप लागणे, थंड घाम, मळमळ किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात.