Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Osteoarthritis Day 2024: हाडं आणि सांध्यांच्या बळकटीसाठी या आहेत महत्त्वाच्या टिप्स

World Osteoarthritis Day 2024: 12 ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक संधिवात दिन साजरा करण्यात येतो. सध्या संधिवात आणि हाडांशी निगडीत अनेक आजार हे लहान वयातच सुरू होताना दिसून येत आहेत. याबाबत अधिक जागरूकता व्हावी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी दिली आहे अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 11, 2024 | 04:41 PM
जागतिक संधिवात दिन का साजरा करावा

जागतिक संधिवात दिन का साजरा करावा

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या संपूर्ण शरीराची रचना आणि वजन हे हाडांवर अवलंबून असते. हाडांमध्ये कमकुवतपणा असल्यास किंवा एखादा आजार झाल्यास पूर्ण शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. हाडं आणि सांधे हे आपल्या शरीरात एक महत्वाची भूमिका बजावतात. जसजसे वय वाढते तसतसे हाडांची घनता कमी होते आणि हाडं कमकुवत होऊ लागतात. यामुळे एखाद्याला ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. हे एखाद्याची गती आणि गतिशीलतेच्या परिणाम करू शकते. शिवाय, खाण्यापिण्याच्या सवयींसह बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे देखील एखाद्याच्या हाडं आणि सांध्यावर परिणाम करू शकते. 

हे ज्ञात सत्य आहे की संधिवातामुळे सांधेदुखी, साध्यांना सूज आणि जळजळ होऊ शकते आणि एखाद्याला सांध्यामध्ये कडकपणा येऊ शकतो तसेच सांधे अधिक संवेदनशील होऊ शकतात. हाडे आणि सांधेदुखीचे व्यवस्थापन करताना वेळेवर हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. डॉ. विशाल लापशिया, जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोप्लास्टी सर्जन, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

कॅल्शियम आणि ड जीवनसत्वयुक्त आहाराचे सेवन 

कॅल्शियम आणि विटामिन डी चा आहार

हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि दुधापासून कॅल्शियम मिळवू शकता. इष्टतम हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अंडी, मशरूम आणि दूध आणि तृणधान्ये तसेच व्हिटॅमिन डीने समृध्द आहाराचे सेवन करा. गरज भासल्यास, डॉक्टरांकडून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सची सल्ला दिला जाईल. नियमित कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चाचण्या करा. DEXA चाचणी ही  हाडांची घनता, हाडांचे आरोग्य आणि ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यात मदत करेल.

हेदेखील वाचा – हिप आर्थरायटिसचे विविध प्रकार, प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत!

दररोज व्यायाम करा

व्यायाम नियमित करावा

नियमित व्यायामामुळे हाडे आणि सांधे मजबूत होण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, चालणे, धावणे आणि पायऱ्या चढणे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यासारख्या क्रिया ऑस्टिओपोरोसिसची शक्यता कमी करतात आणि संधिवाताच्या वेदना कमी करण्यास देखील मदत करतात. स्ट्रेचिंग आणि बॅलन्सिंग व्यायामामुळे लवचिकता आणि शारीरीक चपळता सुधारण्यास मदत होईल. पोहणे आणि सायकल चालवणे देखील सांधेदुखी कमी करण्यासाठी चांगले आहे. आठवड्यातून किमान पाच दिवस फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली 30 मिनिटे व्यायाम करणे आणि कोणत्याही कठोर क्रियाकलाप करणे टाळणे ही काळाची गरज आहे.

वजन नियंत्रित राखा

वजन नियंत्रणात राखण्यासाठी

जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे सांध्यांवर दबाव येतो. लठ्ठपणामुळे सांध्यातील हाडं खराब होऊ शकते आणि संधिवात, वेदना आणि दुखापतींना आमंत्रण मिळू शकते. पौष्टिक आहार आणि रोज व्यायाम करून निरोगी वजन नियंत्रित राखणे योग्य राहिल. तसेच, बसताना योग्य शारीरीक पोश्चर राखा आणि कुबड काढणे टाळा ज्यामुळे पाठ आणि मान दुखू शकते. कामावर जास्त वेळ बसू नका आणि न थांबता अथवा ब्रेक घेता एकाच वेळी जास्त चालत राहू नका.

निरोगी सांध्यांसाठी हायड्रेशन महत्त्वाचे 

पाणी पिणे अत्यंत गरजेचे

पुरेसे पाणी प्यायल्याने सांध्यातील वंगण कमी होते आणि वेदना टाळता येतात. त्यामुळे रोज साधारण ८ ग्लास पाणी तरी किमान प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते आणि त्याशिवाय सांधेही चांगले राहतात. निरोगी राहण्यासाठी पाण्याची शरीराला खूपच आवश्यकता असते. 

हेदेखील वाचा – मुलांमध्ये संधिवात लवकर सुरू होण्याची कारणे, घ्या जाणून

धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा

धुम्रपान आणि अल्कोहोल करणे अत्यंत वाईट

या सवयींमुळे तुम्हाला ऑस्टियोआर्थराइटिस (OA) आणि संधिवात (RA) आणि सांधेदुखीचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे शरीरात जळजळ होते आणि कूर्चा नष्ट होतो. धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन सोडल्यास हाडे आणि सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. धुम्रपान करणे वा सतत अल्कोहोल पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: World osteoarthritis day 2024 important tips for strengthening bones and joints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • Health News
  • world osteoporosis day

संबंधित बातम्या

White House : ‘मी डॉक्टरांचं ऐकत नाही!’ Donald Trump घेत आहेत अ‍ॅस्पिरिनचा ओव्हरडोस; नक्की काय आहे कारण?
1

White House : ‘मी डॉक्टरांचं ऐकत नाही!’ Donald Trump घेत आहेत अ‍ॅस्पिरिनचा ओव्हरडोस; नक्की काय आहे कारण?

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
2

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
3

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.