Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Stroke Day: स्लीप एप्नियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? तज्ज्ञांचा खुलासा

World Stroke Day 2024: जागतिक स्ट्रोक दिन हा ऑक्टोबरच्या 29 तारखेला साजरा केला जातो. यामागील कारणं काय आहेत आणि नक्की कशामुळे स्ट्रोकचा धोका वाढलाय तज्ज्ञांकडून समजून घेऊ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 24, 2024 | 11:53 AM
स्लिप एप्नियामुळे होतोय का स्ट्रोक

स्लिप एप्नियामुळे होतोय का स्ट्रोक

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. पक्षाघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे, जी देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि त्यामुळे आयुष्यभर अपंगत्व येते. स्ट्रोक हे उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी, तणाव, बैठी जीवनशैली आणि अगदी स्लीप एपनिया यासारख्या विविध घटकांशी संबंधित आहे. शिवाय, स्ट्रोक हा उपचार न केलेल्या स्लीप एपनियाच्या धोकादायक गुंतागुंतींपैकी एक आहे. 

स्लीप एपनियाचे व्यवस्थापन करण्यासाठी वजन नियंत्रित राखणे, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे, दररोज व्यायाम करणे वायुमार्गावरील दाब योग्य रहावा यासाठी (CPAP) मशीन वापरणे आवश्यक आहे. डॉ. गिरीश सोनी, न्यूरोलॉजिस्ट, लीलावती हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

स्ट्रोकची समस्या 

स्ट्रोक येतो म्हणजे नेमके काय

जेव्हा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा स्ट्रोकची समस्या उद्भवते. स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इस्केमिक स्ट्रोक जो तुमच्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक तयार झाल्यामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा रोखत असलेल्या ब्लॉकेजेसमुळे होतो. दुसरा प्रकार म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक ज्यामध्ये मेंदूतील रक्त गळते आणि रक्तवाहिनी फुटून मृत्यूही होऊ शकतो. 

हेदेखील वाचा – ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या

स्ट्रोकमुळे काय होते 

स्ट्रोकमुळे एखाद्याच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा संबंध उच्च विकृती आणि मृत्यू दराशी आहे. पक्षाघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये, तोल जाणे, अचानक भुरकट दिसणे, एका बाजूचे तोंड वाकडे होणे, एक हात निष्क्रिय होणे, स्पष्ट बोलता न येणे आदींचा समावेश होत असतो. सांकेतिक भाषेत या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. म्हणूनच, अनुकूल परिणामांसाठी पहिल्या ३-४ तासांत म्हणजेच गोल्डन अवरमध्ये उपचार केला गेला पाहिजे. सध्या स्लीप एपनिया हे स्ट्रोक येण्यामागचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.

स्लीप ऍप्निया म्हणजे काय

स्लिप एप्निया समस्या काय आहे

स्लीप ऍप्निया हा झोपेचा विकार आहे जो झोपेच्या वेळी श्वासोच्छवासावर परिणाम करतो .  स्ट्रोक आल्याने स्लीप एपनिया होण्याची शक्यता अधिक असते. स्लीप एपनियाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) हा इस्केमिक स्ट्रोक म्हणून ओळखला जातो, ज्यात मेंदूला रक्त पोहोचवणारी रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा कमी प्रमाणात झाल्याने हा या प्रकारचा पक्षाघात होत असतो.

हेदेखील वाचा – झोपेत हृद्यविकाराचा झटका येऊन मृत्यू का होतो? ‘स्लीप पॅरालिसिस’ म्हणजे काय? जाणून घेऊया सविस्तर

कसे घडते 

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेली असताना वरच्या श्वासनलिका अडथळा निर्माण होतो आणि श्वास घेण्यास अडचण येते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया असणा-या व्यक्ती घोरते, सकाळी डोकेदुखी जाणवते आणि मूड स्विग्ज यासारखी लक्षणे देखील आढळतात. 

लठ्ठ लोकांना स्लीप एप्नियाचा धोका अधिक असतो ज्यामुळे त्यांना स्ट्रोकची शक्यता असते. 

एका महिन्यात, सुमारे 10 पैकी 3-4 रुग्ण घोरणे, श्वासोच्छवासादरम्यान दम लागणे, वजन वाढणे आणि स्लीप एपनियामुळे थकवा यासारखी लक्षणांसह उपचाराकरिता येतात. स्लीप एप्नियाच्या प्रकरणांमध्ये 40% पेक्षा जास्त वाढ होते. स्लीप एप्निया असलेल्या 20% लोकांना स्ट्रोकचा धोका असतो. ज्यांना स्लीप एप्नियाची समस्या आहे त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झोपेच्या विकारावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज ठरली आहे.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया

काय आहेत कारणे

स्लीप एप्निया व्यवस्थापित करण्यासाठी आणि स्ट्रोक टाळण्यासाठी, लोकांना दररोज व्यायाम करण्याचा, निरोगी वजन राखण्याचा, निरोगी झोपण्याच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. धुम्रपान, अल्कोहोल आणि कॅफीनचे सेवन टाळणे आणि कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (CPAP) मशीनची निवड करणे योग्य राहिल. मोकळा श्वास घ्या, वायुमार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आहे त्यांनी स्ट्रोकसारखे दुष्परिणाम टाळण्यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.

Web Title: World stroke day apnea is reason behind stroke disease increasing truth by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
1

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
2

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
3

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
4

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.