डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी योगासने
सध्या कामाच्या पद्धतींमध्ये बदल झाला आहे. हल्ली सर्व काम घर बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर करता येऊ लागली आहेत. टेकनॉलॉजिमध्ये नवनवीन होणाऱ्या बदलांमुळे सर्वच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोबाईल आणि लॅपटॉप वापरायला जमत असल्यामुळे घर बसल्या सगळी काम होऊ लागली आहेत. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम जसा आरोग्यावर होत आहे, तसाच परिणाम डोळ्यांवर सुद्धा होत आहे. सतत मोबाईल, लॅपटॉप घेऊन काम करत राहिल्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असते. डोळ्यांचे आजार झाल्यानंतर हळूहळू दृष्टी कमी होऊ लागते.
डोळ्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागते. लहान मुलं तासनतास मोबाईल बघत असल्यामुळे त्याच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली आहे. लहान वयातच अनेकांना चष्मा लागला आहे. डोळ्यांचे आजार झाल्यानंतर सतत डोळे दुखणे. दृष्टी कमी होणे, कमी दिसणे, जवळचे किंवा लांबचे दिसण्यास अडथळा निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांवर आर्म मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही योगासने सुद्धा करू शकता. आज आम्ही तुम्हाला योगासनांचे प्रकार सांगणार आहोत, जे नियमित केल्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचा होईल स्वच्छ
डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी शीर्षासन करावे. शीर्षासन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हे आसन केल्यामुळे मेंदू, त्वचा आणि केसांच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात.शीर्षासन करण्यासाठी कठीण असल्यामुळे हे आसन करणे अनेक लोक टाळतात. पण नियमित सराव केल्यानंतर तुम्हाला शीर्षासन करण्याची सवय होऊन जाईल.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी योगासने
सकाळी उठल्यानंतर जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही भ्रामरी प्राणायम करू शकता. घरच्या घरी योगासने केल्यामुळे सुद्धा आरोग्याला सुद्धा फायदे होतात. भ्रामरी प्राणायण केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. या योगासनांच्या सरावामुळे डोळ्यांचे आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच बुद्धी तल्लख होते.
हे देखील वाचा: आरोग्यासाठी घातक ठरते जास्त लिंबू पाणी
दिवसभर काम करून थकून आल्यानंतर डोळ्यांना आराम देण्याची गरज असते. यासाठी हात एकमेकांवर चोळून गरम करून घ्या . त्यानंतर डोळ्यांवरून फिरवा. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल. तासनतास स्क्रीनकडे पाहत बसल्यामुळे डोळे ताणले जातात. त्यामुळे हात गरम करून डोळ्यांवर फिरवा.