Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips: १५ दिवस नियमित चावून खा ‘ही’ हिरवीगार पाने, शरीरात कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पेशींचे होईल रक्षण

उपाशी पोटी नियमित कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2026 | 08:43 AM
१५ दिवस नियमित चावून खा 'ही' हिरवीगार पाने, शरीरात कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पेशींचे होईल रक्षण

१५ दिवस नियमित चावून खा 'ही' हिरवीगार पाने, शरीरात कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पेशींचे होईल रक्षण

Follow Us
Follow Us:

कढीपत्त्याच्या पानांचे फायदे?
कढीपत्त्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे?
शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपाय?

प्रत्येक स्वयंपाक घरात कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. जेवणात कढीपत्ता नसेल तर जेवणाची चव चांगली लागत नाही. कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवणाला फोडणी देण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक लोह (Iron), कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटामिन सी, ए, बी, ई इत्यादी अनेक घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. आज आम्ही तुम्हाला सुप्रसिद्ध योगगुरू डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Periods Pain Remedies: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा

कढीपत्त्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे:

कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते. या पानांमध्ये ‘बीटा-कॅरोटीन’ आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केसांची मूळ मजबूत करण्यासाठी कढीपत्त्याची पाने खावीत. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय केसांची मूळ सुद्धा मजबूत होण्यास मदत होते. सलग दोन ते तीन आठवडे कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केस गळती कमी होते.

गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले पाचक एन्झाइम्स शारीरासाठी अतिशय उत्तम आहेत. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

रक्तात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. चेहऱ्यावर आलेले मुरूम, पिंपल्स आणि मोठे फोड कमी करण्यासाठी कढीपत्याची पाने चावून खावीत. कढीपत्त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणतात. यासोबतच तुम्ही कढीपत्त्याच्या पानांची चटणी सुद्धा खाऊ शकता.

वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. कढीपत्त्याची पाने शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून अतिरिक्त चरबी जाळून टाकतात. सकाळी उठल्यानंतर कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून त्यांचा रस काढून घ्या. कढीपत्याच्या पानांचा रस प्यायल्यानंतर कोमट पाणी प्यावे. १५ दिवस नियमित कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Chew these green leaves regularly for 15 days the body will get rid of the rotten dirt and protect the cells

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • detox drinks
  • diabetes
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
1

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
2

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
3

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
4

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.