लग्नाआधी चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, आठवडाभरात त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात चिया सीड्स मिक्स करून प्यावेत. चिया सीड्सचे पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.
उपवासाच्या दिवशी कायमच रताळी खाल्ली जातात. रताळी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन त्वचा निरोगी, नितळ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोमध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावरील डेड स्किन कायमची नष्ट करतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित ग्रीन टी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. नियमित ग्रीन प्यायल्यास संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल.
डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. यामध्ये ७० टक्क्यांपेक्षाही जास्त कोको पावडर असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डलपणा कमी होतो.