
अंथरूणावर पडल्यानंतर लागेल शांत झोप! झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ
झोपेची गुणवत्ता कशामुळे खराब होते?
शांत झोपेसाठी कोणते पदार्थ खावेत?
हळद खाण्याचे फायदे?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालीचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी अंथरुणावर झोपल्यानंतर शांत झोप लागत नाही. अचानक हातापायांमध्ये वेदना जाणवू लागतात तर कधी पायांमध्ये मुंग्या येतात. रात्रीच्या वेळी शांत झोप न लागल्यास सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो आणि शरीरसंबंधित समस्या उद्भवू लागतात. झोपेच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी दुधात कोणता पदार्थ मिक्स करून सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित समस्या दूर होतील. (फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात हळद असतेच. हळदीचा वापर जेवणातील पदार्थांची चव, सुगंध आणि रंग वाढवण्यासाठी केला जातो. हळदीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये आढळून येणारे विशिष्ट संप्रेरके आणि खनिजे शरीराला रोगांपासून वाचवतात. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे शरीर स्वच्छ होते. झोपेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हळदीचे दूध वरदान ठरेल. यासाठी कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास आठवडाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि झोपेची गुणवत्ता सुधारेल. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. हळदीमध्ये असलेले गुणधर्म स्नायूंवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावे. यामुळे रात्री शांत झोप लागते.
सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले ५ ते ६ बदाम खावेत. बदाम खाल्यामुळे केवळ मेंदूला नाहीतर संपूर्ण शरीराला फायदा होतो. यामध्ये आढळून येणारे मॅग्नेशियम मनावर वाढलेला तणाव कमी करण्यास मदत करतात. तसेच रात्रीच्या वेळी शांत झोपेसाठी तुम्ही बदाम दुधाचे सेवन करू शकता. वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात बदाम भिजत घालावे. सकाळी उठल्यानंतर साल काढून बदामाचे सेवन करावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष, चेरी आणि आंबट फळे खायला खूप जास्त आवडतात. या फळांमध्ये मॅग्नेशियम आणि नैसर्गिक मेलाटोनिन नावाचे घटक आढळून येतात, ज्यामुळे झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी द्राक्ष किंवा चेरी खाऊन झोपावे. शरीराला भरमसाट फायदे होतील.
रात्रीच्या जेवणात कायमच सहज पचन होणाऱ्या हलक्या आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. कारण रात्रीच्या जेवणात झणझणीत, तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास अन्नपदार्थ पचन होत नाही. वारंवार ऍसिडिटी, पोटात जडपणा इत्यादी पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. रात्रीच्या वेळी अन्नपदार्थ पचन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो.
Ans: काम, आरोग्य, पैसे किंवा कौटुंबिक चिंतांमुळे मन रात्रभर सक्रिय राहते.
Ans: झोप लागण्यास ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणे.
Ans: कोमट दूध किंवा कॅमोमाइल चहा पिऊ शकता.