फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट्ट कफ क्षणार्धात पडून जाईल बाहेर! चावून खा 'हे' १ रुपयांचे पान
फुफुसांमधील कफ नष्ट करण्यासाठी उपाय?
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य का बिघडते?
सुपारीच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. कधी सर्दी तर कधी खोकला यांसारख्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणात वाढलेल्या गारठल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. हवेतील संसर्गजन्य विषाणू आणि बॅक्टेरिया शरीरावर हल्ला करतात. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, रेफ्रिजरेटेड पाणी किंवा थंड दह्याचे सेवन केल्यामुळे छातीमध्ये कफ जमा होऊन संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी, खोकला, डोकेदुखी, नाकातून सतत पाणी येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. (फोटो सौजन्य – istock)
वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकल्यामुळे फुफ्फुसांमध्ये कफ जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे श्वासांचा त्रास वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये जमा झालेला विषारी कफ बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आयुर्वेदामध्ये सुपारीच्या पानांना विशेष महत्व आहे. वयस्कर लोकांपासून ते अगदी तरुणांपर्यंत सगळेच सुपारीचे पान खातात. हे पान नैसर्गिकरित्या कफनाशक म्हणून ओळखले जाते. सुपारीच्या पानात दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, यामुळे फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते. याशिवाय घशात वाढलेली जळजळ. खवखव कमी करण्यासाठी सुपारीचे पान चावून खावे. याशिवाय पानांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
खोकला झाल्यानंतर प्रामुख्याने खाल्लेले जाणारे प्रभावी आयुर्वेदिक औषध म्हणजे मध. मधाचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते. याशिवाय मधात नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतात, ज्यामुळे घशात वाढलेली जळजळ, खवखव दूर होते. रात्री झोपल्यानंतर सतत येणाऱ्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळद आणि मधाचे चाटण खावे.
लवंग ओव्याचे सेवन केल्यामुळे घशात वाढलेली खवखव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. यामध्ये तीव्र दाहक-विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि वेदना कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा गुणकारी घटक आढळून येतो. फुप्फुसांमध्ये साचलेला कफ वितळवण्यासाठी लवंग तेलाचे सेवन करावे. मसाल्यांच्या सेवनामुळे छातीतील रक्तसंचय कमी करण्यासाठी आणि श्वसन प्रणाली स्वच्छ करण्यासाठी प्रभावी ठरतात.
Ans: संसर्ग झाल्यास किंवा ॲलर्जी असल्यास तो जाड आणि चिकट होतो आणि त्याचा रंग बदलतो.
Ans: आले, लवंग, दालचिनी घातलेला हर्बल टी, सूप प्या.
Ans: कफ बाहेर थुंकणे किंवा गिळणे, दोन्ही सुरक्षित आहे. मात्र, कफ जाड असल्यास थुंकल्याने बरे वाटते. निरोगी व्यक्तीसाठी कफ गिळणे पूर्णपणे सुरक्षित आहे.






