Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: ‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!

जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण आंदोलकाकडून वाढत्या गोंधळावर मनोज जरांगेने पाटलांनी कान टोचले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे जरांगे यांची भेट घेवुन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा अडवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 31, 2025 | 09:30 PM
Manoj Jarange Patil: ‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण आंदोलकाकडून वाढत्या गोंधळावर मनोज जरांगेने पाटलांनी कान टोचले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लवकरात लवकर यावर मार्गकाढून सरकारने निर्णय घ्यावा असे त्यांनी सागिंतले. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी राज्य सरकारला या गंभीर प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.

सुळे यांच्या गाडीचा ताफा अडवला, शरद पवारांविरोधात घोषणाबाजी

त्यानंतर, मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा अडवला आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा, एक लाख मराठा अशा घोषणा देऊ लागले. काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. या सर्वांमुळे जरांगे यांच्या निषेधस्थळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तथापि, काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना मार्ग दाखवला आणि त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

मनोज जरांगे यांचे आंदोलकांना आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलकांना शांततेचं आणि संयमाचं आवाहन केलं आहे. त्यांच्या व्यासपीठावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा, अगदी तो विरोधी पक्ष किंवा भाजपचा असला तरी, त्याचा सन्मान राखला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. अन्यथा, भविष्यात आपल्याकडे कोणीही येणार नाही, असे त्यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितले.

हे देखील वाचा: मराठ्यांना OBC तून आरक्षण मिळणार की नाही? मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस स्पष्टच म्हणाले – ‘कायद्याच्या चौकटीत…’,

नेमके काय म्हणाले जरांगे?

पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले की, “आपल्या व्यासपीठावर आलेला आपला शत्रू जरी असला, तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा, इथे कोणीही येणार नाही.” ते पुढे म्हणाले, “मला आता पत्रकारांनी सांगितलं की कोणीतरी गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असाल तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. तो विरोधी पक्षाचा असो किंवा भाजपचा असो. जोपर्यंत आपल्याला सहन होतंय तोपर्यंत सन्मान करा. ज्यावेळी आपल्याला वाटेल की आरक्षण मिळत नाहीये, त्यावेळी आपण बघू काय करायचं ते,” असं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं.

‘सरसकट’ शब्दाचा वापर करू नका

जरांगे यांना त्यांच्या ‘सरसकट’ आरक्षणाच्या मागणीवर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देताना ‘सरसकट’ हा शब्द तुम्ही लावूच नका.” ते पुढे म्हणाले की, जर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा या शब्दाला काही आक्षेप असेल, तर त्याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे. सरकारकडे ज्या ५८ लाख कुणबी नोंदी आहेत, त्याच आधारावर ‘मराठा आणि कुणबी एक आहेत’ असा शासन निर्णय काढावा, अशी त्यांची मागणी आहे.

‘कुणबी नोंदी नसलेल्यांनाही उपजात म्हणून आरक्षण द्या’

जरांगे यांनी यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की, “ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत किंवा ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांनाही पोटजात किंवा उपजात म्हणून आरक्षण द्या.” ‘आरक्षण देताना सरसकट शब्दच वापरू नका,’ असा सल्ला देऊन जरांगे यांनी सरकारसमोर आरक्षणाबाबतचा नवा मार्ग खुला केला आहे, ज्यामुळे कायदेशीर अडचणींवर मात करता येईल, असे त्यांनी सुचवले.

Web Title: 1 manoj jarange patil speech protest respect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • maratha aarkshan
  • Mumbai

संबंधित बातम्या

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…
1

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार
2

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार

Raiagad News :  वादळात अडकलं जहाज अन् ; सोळा खलाशांना वाचवणारा ठरला देवदूत, अंगावर काटा आणणारा सुटकेचा थरार
3

Raiagad News : वादळात अडकलं जहाज अन् ; सोळा खलाशांना वाचवणारा ठरला देवदूत, अंगावर काटा आणणारा सुटकेचा थरार

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…
4

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.