Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद; कारण काय तर…

सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे तो बंद आहे. तर बावधन येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व व्यायामशाळेचे मूल्यांकन झाले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2025 | 10:52 AM
ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद

ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 25 जलतरण तलाव सुरु असून, उर्वरीत दहा जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद आहेत. तसेच महापालिकेच्या क्रीडा विभागाने या जलतरण तलावांची पाहणी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेने शहराच्या विविध भागांत जलतरण तलाव उभे केले आहे. उन्हाळ्यात जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असते, त्यामुळे या कालावधीत जलतरण तलाव हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. महापालिकेने उभे केलेल्या ३५ जलतरण तलावांपैकी दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठेत असलेले न. वि. गाडगीळ जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, तो अद्याप सुरु झाला नाही.

कात्रज येथील शंकरराव कदम क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामाची निविदा धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून काढण्यात आली होती. हा जलतरण तलाव सुरु केला गेला आहे. शिवाजीनगर येथील आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव, येरवडा येथील केशवराव ढेरे जलतरण तलाव, पाषाण येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव, औंध गाव येथील औंध जलतरण तलाव, हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हे दुरुस्तीमुळे बंद आहेत. यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे.

घोरपडी येथील नारायण तुकाराम कवडे पाटील जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप करारनामा न झाल्याने तो बंद आहे. सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे तो बंद आहे. तर बावधन येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व व्यायामशाळेचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया पार पडलेली नाही.

शिवदर्शन येथील जलतरण तलाव व क्रीडा संकुलाच्या संदर्भात न्यायालयीन वाद आणि दुरुस्तीमुळे तो बंद ठेवण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जलतरण तलावांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती क्रीडा विभागाच्या प्रमुख किशोरी शिंदे यांनी दिली. पोहण्यास येणाऱ्यांची सुरक्षितता, पाण्याची गुणवत्ता आदीसंदर्भात सूचना संबंधित जलतरण तलाव चालकांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: 10 out of 35 municipal swimming pools closed in the middle of summer nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • Swimming

संबंधित बातम्या

अवघी 9 महिन्यांची चिमुकली पाण्यात ढकललं अन्… रत्नागिरीच्या चिमुकलीची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
1

अवघी 9 महिन्यांची चिमुकली पाण्यात ढकललं अन्… रत्नागिरीच्या चिमुकलीची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

Pune property Tax:  शहरातील १६६७ मिळकतदारांकडे ७६३७ कोटींची थकबाकी
2

Pune property Tax: शहरातील १६६७ मिळकतदारांकडे ७६३७ कोटींची थकबाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.