माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट
बारामती : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यावरूनच सरकारी पातळीवर महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहे. ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरलंय, त्यांना 10 हजार रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
गुरुवारी पावसामुळे झालेल्या बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांनी गुरुवारी पुन्हा दुसऱ्यांदा बारामतीतील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींचा समावेश
मंत्री मात्र म्हणतात, धोरण ठरले नाही
यावर्षी कधी नव्हे ते मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे. धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे पिक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणीत दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आयएमडी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पाहावी, अशी माहिती कोकाटे यांनी परभणी दिली आहे.
अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देणार
यादरम्यान शेतकरी बांधवांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन अजित पवारांनी नागरिकांना दिले आहे. गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले का, धान्य द्यायला सुरुवात केली आहे. आता, ज्यांच्या ज्यांच्या घरात पावसाने पाणी गेलंय, त्यांना 10-10 हजार रुपये देतोय. लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो, असे म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.