Ramai gharkul Yojna Scam: एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांनी संभाजीनगर मधील मोठा घोटाळ उघड कऱणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संभाजीनगर महापालिकेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकूल योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नव्या बॉम्बची वात पेटवली आहे.
इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी भेट घेत त्यांच्याकडे या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, दलाल आणि काही राजकीय नेत्यांचाही यात हाल असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच आयुक्तांकडून लेखी निवेदनानंतर उत्तर मिळाल्यानंर आपण हा घोटाळा पुराव्यासह उघडकीस आणू आणि यात असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या नावांचाही खुलासा करू, असही जलील यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी जलील यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप करत त्यांचे पुरावेही सादर केले होते. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. हा प्रकार सुरू असतानाच त्यांनी आता रमाई घरकुल योजनेतही १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्या आरोप केला आहे.या योजनेत बोगस फाईल्स तया करून अनुदान लाटल्याचादा दावाही त्यांनी केला आहे. लाभार्थ्याला अडीच लाखांचे अनुदान दिले जात असताना अडीच लाखांपैकी लाभार्थ्याला केवळ एक ते दीड लाखांचे अनुदान देऊन बाकीची रक्कम दलाल, महापालिकेतील काही अधिकारी-कर्मचारी लाटल असल्याचा इम्तियाज यांनी केला आहे.
मंगळवारी (१ जुलै) खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेत धडक देत रमाई घरकुल योजनेत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी दलालांशी हातमिळवणी करत हा गैरव्यवहार घडवून आणला. यामध्ये स्वतःला समाजाचे नेते म्हणवून घेणाऱ्या काही बड्या नेत्यांचाही सहभाग असल्याचा त्यांनी ठपका ठेवला.
गडचिरोलीत पावसाची संततधार सुरूच; नदी-नाल्यांना पूर, जिल्ह्यातील 5 मार्ग झाले बंद
जलील यांनी योजनेतील लाभार्थी शोधण्याचे २५ लाखांचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या संस्थेमध्ये दोन माजी नगरसेवकांचा सहभाग असल्याचाही त्यांनी खुलासा केला.“एकाच कुटुंबातील चार जणांना लाभार्थी दाखवून बोगस कागदपत्रांच्या आधारे ही योजना लुटली गेली,” असा आरोप करत जलील म्हणाले की, यासंदर्भातील सर्व पुरावे त्यांनी सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. “यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवर अतिरिक्त आयुक्तांकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही सर्व पुरावे माध्यमांसमोर सादर करू. यात कोणते बडे नेते सामील आहेत, यांची नावेही जाहीर केली जातील,” असेही जलील यांनी स्पष्ट केले.