बेन स्टोक्स आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळणार आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत हा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघ युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आपला दूसरा कसोटी सामना खेळणार आहे. लीड्स येथे या सामन्यात भारताकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत. त्यामध्ये भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी हे पराभवाचे खरे कारणं ठरली होती. दुसऱ्या सामन्यात मात्र शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याच्या प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भारताची चांगली तयारी देखील झालेली आहे.
तर अनुभवी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ मालिकेत १-० ने आघाडीवर असल्याने आजच्या सामन्यात आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे.त्याआधी इंग्लंड संघाने आपला प्लेइंग-११ जाहीर केला आहे. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नसून या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरचा संघामध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु, त्याला अद्याप प्लेइंगमध्ये स्थान मिळवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवरील कसोटी क्रिकेटच्या पाच दिवसांमध्ये बॅट आणि बॉलमध्ये चांगलीच स्पर्धा बघायला मिळणार आहे. इंग्लंडमध्ये अनेकदा दिसून येते की, सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीवर खूप वेग आणि उसळी मिळण्याची शक्यता असते. वरच्या फळीतील फलंदाजांना वेगवान गोलंदाजांनी वापरलेल्या हालचाली हाताळणे आव्हानात्मक वाटण्याची शक्यता आहे. ड्यूक्स बॉल फिरण्याची शक्यता असते, ज्यामुळे सुरुवातीच्या विकेट पडण्याची शक्यता वाढते, विशेषतः जर मैदान ढगाळ असेल तर. भारताच्या संघासाठी जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित खेळणे हे भारतीय संघासाठी मोठे आव्हान असणार आहे.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करूण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप