Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 1156 कोटींचा निधी मंजूर

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांना रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात आला असून रस्ते सुस्थितीत राहावेत व दर्जेदार कामे व्हावी त्याकडे शासनाचा भर असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 19, 2024 | 06:01 PM
ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 1156 कोटींचा निधी मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल 1156 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची सुरुवात झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज डोंबिवलीत पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांचे तसेच नव्याने रस्ता बांधणीसाठी आलेला निधी, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती देण्याबाबत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, भिवंडी ग्रामीण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, उल्हासनगर आदि भागात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांना रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात आला असून रस्ते सुस्थितीत राहावेत व दर्जेदार कामे व्हावी त्याकडे शासनाचा भर असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर राज्यातील विकास कामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली परिसरात लॉ कॉलेजचे मागणी होत होती या पार्श्वभूमीवर जोंधळे कॉलेज, जोशी हायस्कूल दोन ठिकाणी लॉ कॉलेजसाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. शहरात लॉ कॉलेज नसल्याने अनेक जणांना उल्हासनगर, मुंबईच्या दिशेने शिक्षणासाठी जावं लागत होतं आता ही व्यवस्था शहरात झाल्याने शहरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मराठी माध्यमाच्या शाळांबाबत देखील शासनाकडून सकारात्मक पावले उचलले जात असल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

लोकसभा निवडणूक कोणी लढवावी हा निर्णय दिल्लीत घेतला जातो – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण – 
उद्योग मंत्री उदय सावंत यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक कोणी लढवावी हा निर्णय दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्ड घेतं. राज्यातील निर्णय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. ती यादी गेल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल असे सांगितले.

सरकार मराठा समाजाला न्याय देणार – मंत्री रवींद्र चव्हाण
उद्या मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यात आले याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकार करेल असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: 1156 crore fund approved for rural roads in thane district maharashtra government public works minister ravindra chavan dombivli kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 06:01 PM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Government
  • Thane News update

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
3

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.