फोटो सौजन्य - सोशल मिडीया
मागील बऱ्याच दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा बारावा हफ्ता कधी मिळणार याबाबत बरीच चर्चा सुरू होती. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ गिफ्ट देणार का? याबाबत शंका होती. त्यामुळे आता लाडक्या बहीणीची शंका दुर झाली आहे. लाडक्या बहीणींचा हफ्ता हा 7 जुलै रोजी खात्यामध्ये जमा झाला आहे. रक्षाबंधनाच्या २ दिवसाआधीच लाडच्या बहीणीची 13 वा हफ्ता देऊन त्यांना आनंद दिला. जुलैचाच फक्त खात्यामध्ये जमा झाला आहे.
मागिल बरेच हफ्ते हे लाडक्या बहीणींच्या योजनेचे उशीर झाला होता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहीणींच्या योजनेचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर 14000 हुन अधिक पुरुषांनी देखील अर्ज केले होते. पुरुषांनी देखील या लाडक्या बहीणीच्या योजनेचा लाभ वर्षभर घेतला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी राज्यांमध्ये लाखो मैदानी अर्ज केला होता बहुतांश महिलांचा आता अर्ज रद्द करण्यात आला आहे. जून महिन्यातील अकरावा हप्ता हा वेळेवर मिळाल्यानंतर आता जुलै महिन्याची बहिणी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होत्या. अदिती तटकरे यांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणी योजनेचा विशेष हप्ता दिला जाणार असे सांगितले होते पण रक्षाबंधनच्या दोन दिवसाआधी हा हप्ता जमा झाला असून तेरा हफ्त्याचे 1500 रुपये खात्यात जमा झाले आहेत.
सात ऑगस्टपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणी योजनेसाठी ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिला चार चाकी वाहनांच्या मालक आहेत त्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेच्या यादीमधून बाद करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान योजना किंवा नमो शेतकरी सन्माननीय योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये कारण त्यांना अन्य योजनेतून हजार रुपये मिळत आहेत. त्याचबरोबर सरकारी नोकरी असलेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ होणार नाही.