ख्रिस गेलच्या हस्ते प्रो गोविंदा सीझन ३ चे उदघाटन(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तथा प्रो गोविंदा सीझन ३ चा ब्रँड अॅम्बेसेडर ख्रिस गेलच्या हस्ते प्रो गोविंदा सीझन ३ चे उदघाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रो गोविंदा सीझन ३ स्पर्धेचे उद्घाटन वरळी येथील एनएससीआय डोम एसव्हीपी स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. ख्रिस गेलच्या उपस्थितीमुळे प्रो गोविंदा सीझन ३ ला वेगळी वातावरणात वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. तसेच प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने देखील आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा : IPL : संजू सॅमसन RR ला सोडचिठ्ठी देणार! संघ व्यवस्थापनाकडे केली त्याला सोडण्याची विनंती..
प्रो गोविंदा सीझन ३ चा ब्रँड अॅम्बेसेडर ख्रिस गेल म्हणाला की, “गोविंदांची ऊर्जा, त्यांचे संघटन कौशल्य मला प्रचंड भावले. हा केवळ खेळ नाही तर संघटन, परंपरा आणि धैर्याची अभिव्यक्ती आहे. या समृद्ध परंपरेला व्यावसायिकरित्या संघटित, जागतिक दर्जाच्या क्रीडा लीगमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या दूरदृष्टी आणि वचनबद्धतेचे मला फार कौतुक वाटते आहे. प्रो गोविंदा लीगमध्ये सहभागी झाल्याचा मला अभिमान आहे.”
परिवहन मंत्री तथा प्रो गोविंदा लीगचे संस्थापक असलेले प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला आनंद आहे की, मातीतून सुरू झालेला दहीहंडी उत्सव आज प्रो गोविंदाच्या मंचावरून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. मी पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक यांनी सत्यात उतरवले. आज आपण प्रो गोविंदा सीझन ३ साजरा करत आहोत याचा मला अभिमान आहे. यंदाच्या पर्वाचे मुख्य आकर्षण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल आपल्याला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून लाभले. त्यांच्या सहभागामुळे आपला हा उत्सव ग्लोबल होईल. प्रो गोविंदाच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानतो.”
प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले, “स्थानिक स्तरातून सुरू झालेला खेळ हा प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचून तो जागतिक क्रीडा व्यासपीठामध्ये रुपांतरित होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. यंदाची सीझनच्या अंतिम फेरीची प्रचंड उत्कंठा आहे. यंदाचा सीझन दहीहंडी खेळाला जागतिक ओळख मिळवून देईल, असा विश्वास आहे.”
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा तडाखा अन् RR चा कॅमेरा क्रू थोडक्यात वाचला! अखेर मागितली माफी..; पहा व्हिडिओ
महाराष्ट्राची प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या दिवशी १६ संघांनी ताकद, संघटन कौशल्य, समयसूचकता यांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मनं जिंकली. प्रो गोविंदा सीझन ३ च्या दुसऱ्या दिवशी गुणांकन नुसार आपले सादरीकरण करणार आहेत. तर अंतिम दिवस अतिशय उत्कंठावर्धक असणार आहे. या दिवशी वाईल्ड कार्ड एन्ट्री, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना रंगणार आहे. प्रसिद्ध संगीत संयोजक सलीम सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने प्रो गोविंदा सीझन ३ ची सांगता होणार आहे.
• नागपूर निजान्स
• अलिबाग नाईट्स
• शूर मुंबईकर
• ठाणे टायगर्स
•मिरा भाईदर लायन्स
• नाशिक रेन्जर्स
• दिल्ली इगल्स
• सुरत टायटन्स
• जयपूर किंग्स
• बंगळुरू ब्लेझर्स
• हैदराबाद डायनामोज
• गोवा सर्फर्स
• वाराणसी महादेव असेंडर्स
• लखनऊ पँथर्स
• नवी मुंबई स्ट्रायकर्स
• मुंबई फाल्कन्स योद्धा