मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (12th Board Exam) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यातील 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.12 टक्क्यांनी जास्त आहे.
कोकण विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के इतका लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा मुंबईचा लागला असून, 91.95 असा निकाल आहे. राज्यातील 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.12 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी 2023 चा निकाल 91.35 टक्के एवढा लागला होता. या विद्यार्थांच्या ऑनलाईन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येईल.
यंदा राज्यातील 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या हा निकाल ऑनलाईन माध्यमातून लागला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रत ही महाविद्यालयातून घेता येणार आहे.